आर्थिकगून्हादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

ऑनलाईन टास्क फ्रॉड करण्यासाठी बॅंक अकाउंट बनवणारी आंतरराज्य टोळी “गुन्हे शाखा युनिट-४”, कडुन अटक

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १९ डिसेंबर २०२३ ऑनलाईन फ्रॉडचे १७ गुन्हे उघड व ९५ बनावट बॅंक अकाउंट उघडल्याचे निष्पन्न दिनांक- १५/१०/२०२३ रोजी हिंजवडी पोलीस ठाणे येथे एका महिला फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, त्यांना ८७९५३०७२५१ या मोबाईल क्रमांक धारक यांने व्हॉट्सअप मॅसेजव्दारे व टेलिग्राम आयडी @AnanyaAnu023 यावरुन गुगल मॅपवर वेगवेगळ्या हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना रिव्हु व रेटींग देणेचा जॉब असल्याचे सांगुन वेगवेगळे टास्क देवुन ते coinswitch या पोर्टलवर पुर्ण करण्यास सांगुन टास्क मधील रक्कम काढण्यासाठी @Varunpp1, @Sanjay898, @customer028, @finance546 अश्या वेगवेगळया टेलिग्राम आयडीवरुन संपर्क करुन विश्वास संपदान करुन त्यांना coinswitch या पोर्टलवर गुंतवणुक करण्यास सांगुन टास्क पुर्ण करुन मिळणारी रक्कम परत करण्याचे भासवुन त्यांचे कडुन वेळोवेळी एकुण रुपये ७१,८२,५२०/- रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याने हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र. नंबर- १०७४ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब), ३४ आय. टी. ॲक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद होता. अशा प्रकारचे ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे देशभरात वारंवार घडत असल्याने व त्यात लोकांची मोठयाप्रमाणात आर्थिक फसवणुक होत असल्याने मा. पोलीस आयुक्त सो, विनयकुमार चौबे सो. यांनी त्याबाबत गंभीर दखल घेवुन आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आम्हाला आदेशित केले होते.
सदरचा गुन्हा हा गंभीर व तांत्रिक स्वरुपाचा असल्याने आम्ही गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, यांचे कडे सदर गुन्हयाचा तपास वर्ग करुन सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोउनि गणेश रायकर, पोशि/ प्रशांत सैद यांना सदर गुन्हयाबाबत तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. तेव्हा गुन्हे शाखा युनिट ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयात फिर्यादी यांनी ज्या विविध बँक अकाऊंट
मध्ये पैसे ट्रान्सफर केले त्या बॅक अकाउंट बाबत माहिती घेतली. सदर घटने बाबत सखोल तांत्रिक विश्लेषण करुन यातील आरोपींचा शोध घेतला. एकुण १४ आरोपी निष्पन्न करुन अटक करण्यात आली आहे.
आरोपींनी यामध्ये तीन स्तरीय पध्दतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून यामध्ये पहिल्या स्तरावर यातील आरोपी हे गरीब गरजु व्यक्ती यांचा शोध घेवून त्यांच्यानावे वेगवेगळ्या खाजगी बँकेत अकाऊंट व फर्म तयार करत होते, दुसऱ्या स्तरावर आरोपी हे पहिल्या स्तरावर तयार केलेले बँक अकऊंट व किट चेकबुक व इंटरनेट बँकीग विकत घेत होते. तिसऱ्या स्तरावरील आरोपी हे ऑन लाईन टास्क देवुन त्याचा मोबदला देण्याचे पैशाचे आमिष दाखवुन पिडीतांशी व्हॉटसॲप व टेलिग्राफ व्दारे संपर्क साधुन त्यांना आमिष दाखवून पिडीतांकडून पहिल्या स्तरावरील अकाऊंट मध्ये पैसे ट्रान्सफर करुन घेत होते.
त्यानंतर सदर निष्पन्न आरोपींबाबत नियोजनबद्ध तांत्रिक तपास करुन आरोपींचे सद्यास्थितीतील ठावठिकाणे शोधुन आम्ही सपोनि अंबरिष देशमुख, पोउपनि गणेश रायकर, सपोउपनि नारायण जाधव, संजय गवारे, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, पोना/ वासुदेव मुंढे, पोशि/प्रशांत सैद, सुखदेव गावंडे यांची दोन पथके तयार करुन रवाना केल्यावर सदर पथकांनी रात्रंदिवस मेहनत घेवुन मध्य प्रदेश राज्यातील इंदौर, रतलाम, भोपाळ, राजस्थान राज्यातील जयपुर, उदयपुर, भिलवाडा गुजरात राज्यातील वडोदरा, बिहार राज्यातील पाटणा येथुन खालील आरोपींना ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक केली आहे.
१) चिंतन शशिकांत फडके वय-३५ वर्षे, रा. ५०१, बी-३, न्यूयॉर्क सिटी टाउनशिप, निहालपुर मुंडी, इंदौर, मध्यप्रदेश
२) ब्रजराज रामरतन वैष्णव वय १८ वर्षे, रा. रातकोट, विजयनगर, भिलवाडा, राजस्थान
३) सुंदरदास चेतनदास सिंधी, वय-२४ वर्षे, रा. वॉर्ड नं. १७, गुलाबपुरा, राजस्थान.
४) राजेश भगवानदार करमानी, वय-२६ वर्षे, रा. शिवाजी मोहल्ला, नबाब का बेडा, अजमेर, राजस्थान.
५) मोहम्मद रशिद चांद मोहम्मद, वय – ४७ वर्षे, रा-राजपुत मोहल्ला, राताकोट, अजमेर, राजस्थान
६) अभिषेक सत्यनारायण पाराशर, वय – २४ वर्षे, रा-कोठडी मोहल्ला, रायला, ता बनेडा, जि-भिलवाडा, राजस्थान
७) आशिष प्रल्हादराय जाजु, वय-३५ वर्षे, रा-हाफटाऊन कंट्री वुडस सोसायटी, टिळेकरनगर, कोंढवा, पुणे
८) मोहम्मद रौफ मोहम्मद रशिद, वय – २४ वष, रा-मु. पो. राताकोट, ता- विजयनगर, जि- अर
९) नवीनकुमार नेवन्दराम आसनाणी, वय – ४० वर्षे, रा. ६, नळकंठ कॉलनी, शास्त्रीनगर, भिलवाडा, राजस्थान,
१०) विकास सत्यनारायण पारिख, वय – २९ वर्षे, रा- आदर्श नगर, सांगानेर कॉलनी, भिलवाडा, राजस्थान
११) सुरेश गोवर्धनदास सिंधी, वय – ३२ वर्षे, रा-सिंधी कॉलनी, तेजाजी मंदिरा मागे, गुलाबपुरा, राजस्थान
१२) गौरव महावीर सेन, वय – ३१ वर्षे, रा- श्री राम मंदिरा मागे, गुलाबपुरा, राजस्थान
१३) ललित नवरतन मल पारिक, वय-३३ वर्षे, रा- मु.पो.रुपाहेली, ता-हुर्डा, जि-भिलवाडा, राजस्थान
१४) मनिष ऋषिकेश वैष्णव, वय – ३३ वर्षे, रा-शास्त्री नगर, गुलाबपुरा, जि-भिलवाडा, राजस्थान.
सदर आरोपींकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता सदर आरोपी हे अतिशय नियोजन पद्धतीने देशभरातील विविध मोठ्या शहरामध्ये जावुन तेथे नोकरीच्या आमिषाने स्थानिक किवा त्यांचेसह आणलेल्या व्यक्तिीचे
नावाने गाळा भाड्याने घेवुन, शॉप ॲक्ट, उद्यम / एम. एस. एम ई सर्टीफिकेट ऑनलाईन काढुन सदर फर्मच्या नावे वेगवेगळ्या खाजगी बँकांमध्ये करंट अकाउंट उघडत असे.
आरोपींकडुन निष्पन्न झालेल्या विविध अकाउंट मधुन जवळपास २०० कोटींचे फसवणुकीचे व्यवहार झाले असुन सर्व अकाउंट फ्रिज करुन त्यातील मनी ट्रेलचे विश्लेषण करुन फिर्यादींना पैसे परत मिळवुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदर आरोपींकडुन आता पर्यत आर्थिक फसवणुक झाल्याचे १७ गुन्हे उघड करण्यात आले आहे.

१) हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- १०७४/२०२३ मा.दं.वि. कलम ४२०,४०६, ४६७,४६८, ४७१, १२०(ब).३४ आय.टी. ॲक्ट६६ (ड)
२) हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ११२१/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४०६, आय. टी. ॲक्ट ६६ (ड)
३) वाकड पोलीस ठाणे, गु.र. नंबर ९५९/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४०६, आय. टी. ॲक्ट ६६ (ड)
४) चिंचवड पोलीस ठाणे, गु.र. नंबर ४७६/ २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, आय.टी. ॲक्ट ६६ (ड)
५) चिंचवड पोलीस ठाणे, गु.र.नंबर-४७८/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, आय.टी ॲक्ट ६६ (ड),
६) पिंपरी पोलीस ठाणे, गु.र. नंबर – ९२२/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४०६, आय.टी. ॲक्ट ६६ (ड)
७) आळंदी पोलीस ठाणे, गु.र. नंबर-२७१ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, आय.टी. ॲक्ट ६६ (ड)
८) चिखली पोलीस ठाणे, गु.र. नंबर- ६१९ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४०६
९) अवधुतवाडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-९५५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४०६, आय. टी. ॲक्ट ६६ (ड) (यवतमाळ)
१०) अवधुतवाडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-१२१५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, आय. टी. ॲक्ट ६६ (ड) (यवतमाळ)
(११) पुर्व विभाग सायबर पोलीस ठाणे गु.र. नंबर- ५९/२०२३ मा.दं.वि. कलम ४२०, १२० (ब) आय.टी. ॲक्ट ६६ (ड)
१२) पुर्व विभाग सायबर पोलीस ठाणे, गु.र.नंबर-४५/२०२३ भा.दं.वि. कलम ४२०,४०६,४६७, ४६८,४७१, १२० (ब), ३४ आय. टी. ॲक्ट ६६(ड) (मुंबई)
१३) दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाणे, गु.र.नं-११/२०२३भा.दं.वि.क-४२०,४०६,४६७,४६८, ४७१, १२० (ब), ३४ आय.टी. ॲक्ट ६६ (ड) (मुंबई)
१४) सायबर क्राईम पोलीस ठाणे, सायबराबाद, गु.र. नंबर- १५२०/२०२३भा.दं.वि.क-४२०, आय. टी. ॲक्ट ६६ (ड) (कर्नाटक)
१५) सेंट्रल सायबर पोलीस ठाणे बेंगलोर येथे गु.र.नंबर-४२७ / २०२३ भा.दं.वि. कलम ४१९४२०, आय.टी. ॲक्ट ६६(ड) (कर्नाटक)
१६) सायबर क्राईम पोलीस ठाणे, आगरा, गु.र.नंबर-६३ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, आय. टी. ॲक्ट ६६ (ड) (उत्तर प्रदेश)
१७) सायबर क्राईम पोलीस ठाणे, हावडा, गु.र. नंबर १९/२०२३ भा.दं.वि. कलम ४१९,४२०,४०६,१२० (ब). आय. टी. ॲक्ट ६६ (ड) (पश्चिम बंगाल)
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे सो, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी सो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री. सतिष माने साो, सहा. पोलीस आयुक्त, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट ४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, सपोनि अंबरिष देशमुख, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, पोउपनि आबासाहेब किरनाळे सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, सुरेश जायभाये, पोशि / प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सपोनि सागर पानमंद, पोउपनि सागर पोमण, पोहवा/नागेश माळी, पोशि/ नितेश बिचेवार, पोपट हुलगे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!