आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर सही करणाऱ्या माथेफिरू आमदार महेश लांडगे यांच्या जाहीर निषेधाचे आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ सप्टेंबर २०२४ भारतीय संविधान भवन आता पिंपरी चिंचवडला होत असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) प्रशासनाने प्रस्तावित जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. भारतीय राज्यघटना आणि जगभरातील लोकशाही देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करता यावा. तसेच, संविधानाविषयी जनजागृती व्हावी. या करिता भारतातील पहिले संविधान भवन उभारण्यात येत आहे.
मात्र असे असताना प्रसिध्दीच्या हव्यासापोटी भाजप आमदार महेश लांडगे यांचा नवीन प्रताप समोर आला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर आमदारांनी चक्क स्वतःची सही छापली आहे, त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे दिसते आहे.
भाजप आमदार महेश लांडगे यांनी भारतीय संविधान भवनाची जाहिरात करत असताना ॲटो रिक्षावर ‘विचार लोकशाहीचा, अभिमान संविधानाचा’ अशी टॅगलाईन टाकून एका बाजूला संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि दुस-या बाजूला स्वताचा फोटो छापला आहे. असे असताना आमदार यांनी स्वताच्या फोटोवर सही न करता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर स्वताची सही छापली आहे.
अशा अनेक रिक्षा सध्या पिपरी चिंचवड शहरात फिरत आहेत. त्यातीलच एका रिक्षाचा फोटो सोशल मिडीयावर वायरल झाल्याने हा विषय चर्चेत आला.

मागील काही दिवसांन पूर्वी मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या १०० फूट उंचीच्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले होते आणि आता संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोवर चक्क आमदारांनी स्वत:ची सही केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार असलेल्या भोसरी विधासभेत या दोन महापुरूषांचा अवमान करण्याचा प्रकार झाला आहे हे मात्र नक्की.
मागील वेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या काही भागांना तडे गेल्याचे समोर आले होते. या संदर्भात पालिका आयूक्तांनी देखील घाईगडबडीत स्वताचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ करून या विषयावरिल लक्ष दुसरीकडे वळवण्याचा (Divert) केविलवाना प्रयत्न केला होता. म्हणून यावेळी आंबेडकरवादी संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने बाबासाहेबांचा झालेला अवमान जिव्हारी लागल्याने निषेध आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. व कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही. असे बोलले जाते.
भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी संविधान भवन संदर्भातील जाहिरातीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोवर स्वतःची सही टाकून आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्यापेक्षा आपण मोठे असल्याचा आव आणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान व बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी उद्या रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.०० वाजता डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर पुतळा, “भीमसृष्टी स्मारक”, पिंपरी चौक या ठिकाणी सर्व आंबेडकरवादी संघटना व सामाजिक संघटनांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. असे धम्मराज साळवे व शिवशंकर उबाळे यांनी सांगीतले या सोबत डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणार्‍या सर्वांनी या आंदोलनास उपस्थित रहावे अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!