महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक
भक्ती शक्ती लगतची जागा सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी असावी शरद पवारांना निवेदन..

प्रतिनिधी आळंदी देवाची दि. ०१ आक्टोंबर २०२३ आळंदी (चर्होली फाटा) येथे भागवत वारकरी संमेलनाच्या संमेलन उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार व शिरूरचे खासदार अमोल कोल्हे आले होते . त्यावेळी भक्ती शक्ती लगतची ही जागा सर्व सार्वजनिक उपक्रमासाठी कायमस्वरूपी राखीव राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. याचे तपशीलवार निवेदन भक्ती शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी मारूती भापकर व समितीचे सदस्य उपस्थित होते. त्यावर श्री पवार व कोल्हे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.




