देशाची प्रगती सुशिक्षित स्त्रीवर अवलंबून असते.

अभ्यासू नेतृत्व, शिवसेनेची वाघीण प्रा. सुषमाताई अंधारे त्यांची सदिच्छा भेट घेतली-श्री भाग्यदेव घुले
प्रतिनिधी पूणे दि. १० ऑक्टोबर २०२५ दिघी- बोपखेल भागातील विविध विकास कामासाठी सुषमाताईनशी चर्चा करण्यात आली.
काही भेटी या फक्त औपचारिक नसतात, त्या मनाला उर्जा देतात, विचारांना दिशा देतात आणि पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास निर्माण करतात.
आजची भेट तशीच होती भविष्यातील भूमिका आणि जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या, यासाठी योग्य दिशा आणि नैतिक आधार मिळवण्यासाठी अशा भेटींची गरज असते.
सुषमा ताई फक्त नेत्या नाहीत, त्या माझ्यासाठी योग्य मार्गदर्शका आहेत.
त्यांच्या शब्दांमधील ताकद, त्यांच्या विचारांमधील स्पष्टता आणि त्यांच्या उपस्थितीतील मायेची ऊब ही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
ही भेट माझ्यासाठी पुढील प्रवासासाठी आधारस्तंभ ठरली आहे. या वेळी गोपी घुले प्रशांत नाईक संतोश गायकवाड उपस्थित होते.



