प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ फेब्रूवारी २०२४ पिंपरी चिंचवड शहरात वाढत असलेले अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी व यूवकांना मुक्त श्वास घेता येईल जागोजागी गूटखा, हूक्का, गांजा सारख्या पदार्थाचा यूवापिढीत वापर वाढलेला दिसून येत आहे. त्यावर लवकरात लवकर बंदी घालावी व अशा विक्रेत्यांना या व्यवसायापासून दूर करावे सोबत यांना मदत करणारे देखील शोधून वेळीच त्यांना देखील समज द्यावी असे बहूजन एकता आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्र पवार यांनी पोलिस आयूक्तांना दूसर्यांदा निवेदन दिल्यानंतर आमच्याशी बोलतांना सांगीतले.
पूढे ते बोलले वरील विषयाला अनुसरून
दिनांक २२/०९/२०२३ रोजी निवेदन दिले तरी अद्याप पर्यंत पोलिस आयूक्तांनी योग्य ती कार्यवाही केलेली दिसत नाही. पोलिस आयुक्त योग्य त्या प्रकारची भूमिका घेताना दिसत नाही, म्हणून आम्हाला आयुक्तालया समोर धरणे आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नये तसे घडल्यास याला जवाबदार आपण राहणार आहात.
या व्यसनांच्या आहारी जावून पूढे हीच मूले गुन्हेगारी कडे वळतील व चोऱ्यामाऱ्या लूटमार करून व्यसनभूख भागवतील याला सुद्धा आपणच जबाबदार राहणार आहात तेव्हां लवकरात लवकर व्यसनांच्या विळख्यातील हे पिंपरी-चिंचवड शहर मूक्त करून युवक व विद्यार्थी वाचवावा अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबायला लागेल.
यावेळी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल रोकडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष राज जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष भालेराव, भोसरी विधानसभा अध्यक्ष संजय गोफनारायन व कार्यकर्ते उपस्थित होते.