भाजपचे “सरकार आपल्या दारी” काॅंग्रेसचे “नेते घेवून जाते आपल्या घरी”
विशेष प्रतिनिधी मूंबई दि. १२ फेब्रूवारी २०२४ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष
राहुल नार्वेकर यांची आज (सोमवार) सकाळी भेट घेतली आणि त्यांच्याकडे आमदारकीचा राजीनाम्याचे पत्र सादर केले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का देण्याचा भाजपाचा विचार आहे असे दिसते. चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची ही चर्चा आहे.
अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे आणखी तीन नेते
व काँग्रेसचे काही नगरसेवक ही आहेत.
अशोक चव्हाण लवकरच भाजप कार्यालयात येणार आहेत असे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते आहे.
जर ते भाजपात सामिल झाले तर भाजपा त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवू शकते. जर अशोक चव्हाणांनी हे पाऊल उचलल्यास अलीकडच्या काळातील काँग्रेससाठीचा हा तिसरा धक्का असेल. यापूर्वी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता.
सिद्दीकी यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
अशोक चव्हाणांनी काँग्रेस का सोडली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज होते. त्यांना पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र त्यांनी याला नकार दिला. भाजपची लाट जाणवत असल्याचे ते म्हणाले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद सोडल्याने अशोक चव्हाणही संतापले होते, पटोले यांच्यामुळेच महाराष्ट्रात सरकार पडल्याचे ते मानतात. नाना पटोले यांना अध्यक्षपदावरून हटवून त्यांना महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष करावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या हायकमांडकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यादरम्यान नाना पटोले दिल्लीला रवाना झाले आहेत.