गून्हामहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

“बाबासाहेबांची” जयंती साजरी करणे हाच माझा गून्हा…?

पिंपरी प्रतिनिधी- “आंबेडकरवादी चळवळ” पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने दिनांक ०३ जून २०२३ रोजी पिंपरी येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक भिमसृष्टी या ठिकाणी सर्व सामाजिक पक्ष संघटनेच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली म्हणून नांदेड या ठिकाणी आंबेडकरी कार्यकर्ते “अक्षय भालेराव” यांचा निर्घृण खून केला गेला. तरी आमची मा.मुख्यमंत्री आणि मा. गृहमंत्री यांना विनंती आहे. या सर्व घटनांवर आपला अंकुश असावा. समाजा समाजात जातिय द्वेश वाढत आहे. अन त्यातूनच हा खून झालाय तरी आपण स्व:ता यात लक्ष घालावे. या व अशा घटनांचा निषेध करण्यासाठी समविचारी पक्ष संघटनेच्या वतीने दिनांक ०६ जून २०२३ रोजी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक “भिमसृष्टी” समोर पिंपरी या ठिकाणी निषेध आंदोलन घेण्यात येणार आहे. तरी सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे बैठकी मध्ये आंबेडकरवादी चळवळ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आवाहन करण्यात आले.
या वेळी धूराजी शिंदे, देवेंद्र तायडे, राजन नायर, अंकूश कानडी, चंद्रकांत लोंढे, शिवशंकर उबाळे, गोपाल मोरे, अरूण मैराळे, रामभाऊ ठोके, प्रविण कांबळे, मूकूंद रणदिवे, सूनिल गायकवाड,व असंख्य सामाजिक राजकीय संघटनेचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!