श्री. महर्षी मातंगऋषी व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची संयुक्त जयंती निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी.
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ फेब्रूवारी २०२४ महापुरुषाची जयंती म्हणजे त्यांच्या विचाराचा वारसा असतो. क्रांतिवीर विचार मंच महाराष्ट्र राज्यच्या वतिने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे श्री. महर्षी मातंगऋषी व संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. प्रथम महापूरूषांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करून करण्यात आली या नंतर या महापूरूषांचे विचार उपस्थित समाज बांधवाना मान्यवरांनी आपआपल्या भाषणातून सांगण्यात आले. यावेळी समाज बांधव व भगिनी उपस्थित होते यात प्रामुख्याने समन्व्यक डी. पी. खंडाळे, आबा मांढरे, गणेश कालवले, रामेश्वर बावणे, विशेष क्रांतिवीर विचार मंचाचे अविनाश शिंदे, राजू आवळे, धीरज सकट, माणिक पोळ, रमेश अडागळे, बाबू पाटोळे, गणेश तुपे, बाप्पू झाडे, सागर कापसे, आनंद कांबळे, अविनाश गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे समाजसेविका सविताताई सोनवणे, ललिताताई कांबळे, मायाताई कलवले, स्मिताताई सोनवणे महिला वर्ग सुद्धा स्फूर्तीने उपस्थित होते. व क्रांतिवीर विचार मंच महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.