राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांच्या वाढदिवसानिमित्त शहर युवकच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ३१ डिसेंबर २०२४ माजी नगरसेवक राहुलदादा कलाटे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्यावतीने “सावली निवारा केंद्र” येथील अनाथ गरजूंना अन्नधान्य व आवश्यक अशा साहित्याचे वाटप करण्यात आले,
यावेळी बोलताना शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “संस्थेतील अनाथ गरजूंच्या पाठी सदैव उभे राहण्याचे व वेळोवेळी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून समाजातील विविध घटकातील लोकांनी संस्थेतील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले” यावेळी मराठवाडा सेवासंघाच्या वतीने मा. अरुण पवार यांनी देखील संस्थेला वेळोवेळी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
तसेच संस्थेचे प्रमुख एम. हुसेन यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानून संस्थेच्या वतीने माननीय राहुलदादा कलाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर, शहर विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर, लीगल सेल शहराध्यक्ष ॲड. संतोष शिंदे, प्रसिद्ध व्यावसायिक अरुण पवार, रजनीकांत गायकवाड, चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे, ओम शिरसागर, विशाल कदम, परवेज शेख, जमीर सय्यद व तोफिक शेख, विकास वाघमारे इतर सहकारी मान्यवर उपस्थित होते.