प्रतिनिधी पूणे दि. २६ फेब्रूवारी २०२४ भारतातील पहिला आंबेडकरी ब्रँड “बोधितत्त्व”ने तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी एक विशेष फ्रँचायझी मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा केवळ एक कार्यक्रम नसुन तरुणांनी सामाजिक कार्यासोबतच आर्थिक प्रगती करण्यासाठी सामाजिक उद्योजकतेचा एक प्रयत्न आहे. उद्योगात पुढे जाण्याची इच्छा असणार्या तरुण उद्योजकांना ब्रँड सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत.
आंबेडकरी चळवळीचे प्रतीके टी-शर्ट, पेन, कॅप आणि बॅच सारख्या दहा पेक्षा अधिक प्रॉडॅक्टद्वारे व्यवसाय आणि सांस्कृतिक ओळखीचे अनोखे मिश्रण तयार करण्याच्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे.
कार्यक्रमाची माहिती: दिनांक: २९ फेब्रुवारी २०२४
वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी १:३०
स्थळ: एस. एम. जोशी सभागृह, पुणे.
फ्रँचायझी मेळाव्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे.
“बोधितत्त्व” सोबत व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींना आणि उद्योगात पुढे जाऊ इच्छित असणार्या उद्योजकांना आम्ही आमंत्रित करीत आहोत.