प्रतिनिधी भीमा कोरेगाव दि. ०१ जानेवारी २०२५ भीमा कोरेगाव येथे (१ जानेवारी) म्हणजेच नववर्षच्या पहिल्याच दिवशी २०७ वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लाखो अनुयायी उपस्थित आहेत. ज्यामध्ये ॲड. प्रकाश आंबेडकर अजित पवार, दत्ता भरणे, आणि अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि संबंध देशभरातील राज्यांमधून असंख्य भीम अनुयायी दाखल झाले आहेत. अवघे जग नववर्षाचा पहिला सूर्योदय पाहात असताना भीम अनुयायांनी मात्र या कोरेगाव भीमा येथे सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
भीमा कोरोगाव येथील विजयस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी राजकीय नेत्यांसोबत सामान्य जनताही मोठ्या उत्साहात हजर झाली आहे. ज्यामुळे येथील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत.
त्यामुळे पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणावर तैनात केले जाते. १ जानेवारीला भीमा कोरेगावच्या २०७ वा वर्धापन दिनानिमित्त होणारा कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आला आहे. यामध्ये ४,५०० सुरक्षा कर्मचारी, १२० एकर पार्किंग क्षेत्र, सुमारे ३८० PMPML बस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) ची समर्पित टीम यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला राज्य आणि देशभरातून अभ्यागतांची लक्षणीय गर्दी होईल अशी अपेक्षा आहे.