प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.०१ जानेवारी २०२५ पुणे मेट्रो प्रशासनाच्या ठेकेदाराकडून निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे बीआरटी बस स्थानकाच्या नाम फलकाचे नुकसान करून विटंबना करण्यात आली होती. तसेच इतर गोष्टी काम करत असताना चुकलेल्या होत्या त्याच्या निषेधार्थ बहुजन समाजातील प्रामुख्याने मातंग समाजाचे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गट युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती माजी अध्यक्ष अण्णासाहेब कसबे व शिवशाही व्यापारी संघ प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे यांनी उपोषणाचा हत्यार उगारले होते. मेट्रो प्रशासनानं उपोषण स्थगित करण्यासाठी लेखी आश्वासन दिल्याने तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
लेखी आश्वासनांची पूर्तता ३१ डिसेंबर २०२४ रोजी मेट्रो प्रशासनाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या नावाचा नाम फलक एलईडी थ्रीडी मध्ये लावून उचित सन्मान केल्याबद्दल पुणे मेट्रो प्रशासन व मेट्रो विभागाचे मुख्य व्यवस्थापक श्रावण हर्डीकर साहेब त्यांचे सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने विधान परिषदेचे आमदार अमित गोरके सर यांच्या मार्गदर्शनाखाली मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
यापुढील काळामध्ये अशाच पद्धतीने सहकार्य ठेवतील एवढीच माफक अपेक्षा साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती माजी अध्यक्ष संजय ससाने शिवाजीराव साळवे , जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा. अध्यक्ष मार्गदर्शक डी. पी. खंडाळे, रामदास कांबळे, राजु चव्हाण, माथाडी कामगार नेते आबासाहेब मांढरे शिवशाही व्यापारी संघ पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे कार्याध्यक्ष अमोल लोंढे, भोसरी विधानसभा अध्यक्ष मारुती काळे, युवा सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव, मावळ लोकसभा अध्यक्षा भारती ताई चांदणे, मुळशी तालुका अध्यक्षा संगीता ताई जाधव, मुख्य सचिव कल्पना मोरे (दाखले), गणेश साठे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे प्रतिष्ठान दिघी परिसरातील युवा नेते संजय येडके, शिवशाही संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले , वरिष्ठ उपाध्यक्ष माणिकराव पोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, अक्षय पोळ, आदी प्रमुख पदाधिकारी यांनी यावेळी आभार व्यक्त केले.