देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

प्रत्येक निवडणूकीत १०० उमेदवार उभे करा इव्हिएम व निवडणूक आयोग “कन्फ्युज” होईल..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२९ फेब्रूवारी २०२४ इंडिया आघाडी व सर्व जागृत सामाजिक संस्था, संघटनांनी अविश्वसनीय ईव्हीएम मशिन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक होण्यासाठी आगामी लोकसभा व इतर सर्वच निवडणुकीत १०० उमेदवारी अर्ज दाखल करावेत. असे मारुती भापकर यांनी या वेळी आपले मत व्यक्त केले.
पूढे ते बोलले की भारत देश जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. पूर्वी बॅलेट पेपरवर निवडणूक होत होत्या. मात्र काँग्रेस पक्षाच्या काळात ईव्हीएम मशीनद्वारे निवडणूक घेण्याची पद्धत अवलंबली गेली. त्याकाळी विरोधी पक्षात असणारे भारतीय जनता पक्ष व त्यांचे मित्र पक्षांनी या पद्धतीच्या विश्वासार्हते बाबत आक्षेप नोंदवले गेले. सन २०१४ काँग्रेस पक्षाचे सरकार जाऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले. विरोधी पक्षात असताना विरोध करणारे भाजपा, ईव्हीएम पद्धतीचा समर्थन करायला लागले. ग्रामपंचायत ते लोकसभा अशा अनेक निवडणुकीमध्ये ईव्हीएम बाबत अनेक आक्षेपार्य घटना मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर आल्या. त्यामुळे अनेक संस्था संघटनांनी ईव्हीएम पद्धतीला विरोध केला. अनेक आंदोलन झाली. मात्र भारत सरकार व भारतीय निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष करून ईव्हीएम मशीन द्वारेच मतदान प्रक्रिया राबविली आहे.
स्वच्छ पारदर्शक लोकाभिमुख व विश्वासार्ह निवडणूक होऊन त्याद्वारे आपण दिलेल्या मतांवर बहुमताने निवडून आलेल्या उमेदवारच लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत गेला पाहिजे अशी अपेक्षा प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे. मात्र ईव्हीएमद्वारे मतदान केल्यानंतर आपल्या मनातीलच उमेदवाराला मतदान जाते की नाही याबाबत अनेक भारतीय नागरिकांच्या मनामध्ये संशय आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व त्यानंतर होणारी विधानसभा महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत या सर्व निवडणुका ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यायच्या असतील तर इंडिया आघाडी व सर्व सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने प्रत्येक मतदारसंघानिहाय १०० पेक्षा अधिक उमेदवार उभे केले तर निश्चित त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्या लागतील. हा फॉर्मुला अनेक वेळा आम्ही अनेक चर्चांमधून, सभां मध्ये मांडला आहे. ईव्हीएम मशीनवर १४ उमेदवारांची मतपत्रिका असते त्यामुळे जास्तीत जास्त चार युनिटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ ६०च उमेदवारांची मतपत्रिका ईव्हीएम मशीन वर सेट होऊ शकते.
आपल्या महाराष्ट्रातील परभणी येथील चाटे पिंपळगाव तालुका पाथरी या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक घेताना त्या ठिकाणे १५५ उमेदवारी अर्ज भरला तेथील निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोगाला रद्द करावी लागली. हाच फॉर्मुला जर देश पातळीवर इंडिया आघाडी व सामाजिक संस्था संघटनांनी प्रत्येक मतदारसंघानिहाय वापरला तर निश्चित भारतीय निवडणूक आयोग व भारत सरकारला ईव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. त्यातून प्रत्येक भारतीय नागरिकांचा लोकशाही वरचा विश्वास प्रबळ होऊन, लोकशाहीचे सक्षमीकरण होईल. भारतीय संविधान मजबूत होईल. तरी प्रत्येक भारतीय नागरिकांनी यावर गांभीर्याने विचार करून कृती करावी असे मारुती भापकर यांनी सर्व पक्ष संघटनेला सांगीतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!