आंदोलनगून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

संकेत भोसले हत्याकांडातील सर्व फरार आरोपींना ताबोडतोब अटक करावी-दुर्गेश उघडे

प्रतिनिधी मूंबई भिवंडी दि. २९ फेब्रूवारी २०२४ भिवडी शहरातील दलीत कुटूंबातील संकेत सुनिल भोसले या १६ वर्षीय लहान मुलाचा भिवडी शहरातील शिवसेना शिंदे गटातील उपशहर प्रमुख कैलास धोत्रे यांनी व त्यांच्या सहका-यांनी अपहरण करून निघृणपणे खून केला आहे. या प्रकरणाने महाराष्ट्रातील वातावरण तनावपूर्ण झाले आहे. उशिर का होईना पोलीसांनी सुत्र हलवली व काही आरोपींना अटक केली आहे.
परंतु यातील काही आरोपी आणि मुख्य आरोपी फरार आहेत. फरार आरोपी हे राजकीय लोकांच्या सहवासात आहेत, राजकारण्यांनी सांगितल्यानुसार वे फरार झाले आहेत असे वाटत आहे. महाराष्ट्रात दलीतांवर सतत कोठे ना कोठे हमले होत असतात यात दलितांना जिवे देखील मारले जाते. असाच प्रकार भिवंडीतही झाला आहे. ज्या लहान बालकाने बालवयालाही पुर्ण केले नाही अशा लहान मुलाला अमानूष पणे मारून माणुसकीला काळीमा फासला जाईल असा हा प्रकार शिंदे गटातील काही राजकारण्यांद्वारा झाला आहे. ज्या लहान मुलाचा खून करण्यात आला आहे त्याचे प्रथम अपहरण करण्यात आले होते नंतर त्याला नशेचे अंमली पदार्थ पाजले गेले व दोन तिन ठिकाणी जबरदस्तीने डांबून ठेवून तो वाचणार नाही, त्याचा जीव जाईल या हेतुने मारले गेले आहे. या प्रकरणातील सर्व फरार आरोपींना ताबोडतोब अटक करावी व सर्व आरोपींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून संकेत भोसले याला व त्याच्या परिवाराला न्याय देण्यात यावा या विषयाचे निवेदन महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे दुर्गेश उघडे यांनी वरिष्ठ पोलिस निरिक्षक भिवंडी पोलिस ठाणे यांना देण्यात आले. यात ते पूढे म्हणतात की जर आपण १० दिवसांत फरार आरोपीना अटक केली नाही आणि पिडीत परिवाराला न्याय दिला गेला नाही तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतिने संपूर्ण महाराष्ट्रभर जनआंदोलन, धरणे आंदोलन उभारले जाईल त्यावेळे असणारी सर्व जबाबदारी भिवंडी शहर पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र शासनाची असणार आहे. या प्रकरणाला गांभिर्याने घ्यावे व संकेत भोसले हत्याकांड प्रकरणातील फरार आरोपींना त्वरीत अटक करून कारवाई करावी. अन्यथा पक्षाच्यावतिने रास्तारोको व चक्काजाम करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दुर्गेश उघडे, शहराध्यक्ष मनोज कांबळे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष शारदाताई बागुल, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत जगताप, प्रमोद शिंदे, व महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!