
प्रतिनिधी तळेगाव दि. ०८ मार्च २०२४ ०५ आरोपी व दोन अतिविस्फोटक एटीएफ / जेट इंधन टैंकर ताब्यात पिंपरी चिंचवड शहरात पेट्रोल / डिझेल / ऑईल यांचा चोरुन काळाबाजार होत आहे अगर कसे याबाबतची माहिती काढुन कडक कारवाई करणे संदर्भात मा. श्री. विनयकुमार चौबे साो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी आदेशित केले आहे.
त्यानुसार दि. ०६/०३/२०२४ रोजी श्री. संतोष पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट ०४ पिपरी चिंचवड यांना तळेगाव पोलीस स्टेशनचे हद्दीत शातांई हॉटेलचे बाजुला रस्त्याचे कडेला ओल्ड मुंबई पुणे हायवे सोमाटणे फाटा टोल नाक्याजवळ पुणे या ठिकाणी काही इसम हे ATF / जेट इंधन टँकर चालकाशी संगनमत करुन आर्थिक मोबदल्यामध्ये त्यांचे टँकरमधुन ATF/जेट इंधन काढुन चोरी करुन सदर इंधनाचा काळ्याबाजारात वाढीव दराने विक्री करुन आर्थिक फायदा मिळवत आहे, अशा आशयाची बातमी मिळालेवरुन सपोनि संतोष पाटील, पोउपनि किरनाळे, सपोफौ जाधव, पोहवा ९१६ शेटे, पोहवा ६१७ दळे, पो हवा १५१६ जायभाये, पो.हवा. ११८६ नदाफ, पोशि १८७२ चव्हाण, पोशि २१०२ सैद, पो.शि. २७२० गावंडे असे गुन्हे शाखा युनिट ०४ कडिल अधिकारी/अंमलदार पंचांसह बातमीचे ठिकाणी पोहचुन सापळा लावुन खात्री करता,
बातमीप्रमाणे खात्री होताच सदर ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी जागामालक १) मंगेश सखाराम दाभाडे वय ४२ वर्षे रा. भेगडे आळी शनिवार पेठ तळेगाव दाभाडे पुणे याने टँकर क्र एमएच०४/एफ डी/५४५६ चा चालक नामे २) ईलाही सैफन फरास वय ४५ वर्षे रा. कलवड वस्ती मशिद जवळ फाळके चौक धानोरी पुणे व टँकर क्र एमएच ४३ / वाय / ७३२९ चा चालक नामे ३) अनिल सतईराम जस्वाल वय २८ वर्षे रा. राणीसरांग आजमगड उत्तर प्रदेश यांचेशी संगनमत करुन स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता त्याचे कडील कामगार नामे ४ ) अमोल बाळासाहेब गराडे वय ३१ वर्षे रा. मुपो पिपंळ खुटे ता मावळ जि पुण ५) परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड वय ३६ वर्षे रा. दाभाडे वस्ती च-होली खुर्द ता खेड जि पुणे यांचे मदतीने टँकर क्र एमएच०४/एफडी/५४५६ मधुन एटीएफ / जेट इंधन चोरी करताना व टॅकर क्रमांक एमएच ४३ /वाय / ७३२९ यातील चोरुन एटीएफ / जेट इंधन काढणेसाठी लावत असताना मिळुन आले. त्यांचेकडुन घटनास्थळी खालील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
१) ४०००/- रुपये किमतीचे एक फ्लॅस्टीक कॅन त्यामध्ये प्रत्येकी २० लिटर वजनाचे एटीएफ / जेट इंधन
२) २०००/- रुपये किमतीचे एक फ्लॅस्टीक कॅन त्यामध्ये प्रत्येकी २० लिटर वजनाचे एटीएफ / जेट इंधन
३) १२००/- रुपये किमतीचे ०६ फ्लॅस्टीकचे रिकामे कॅन जुवा
४) १००/- रु किमतीचे एक फ्लॅस्टीकचे नरसाळे जु वा
५) ००/- रु किमतीचे टँकरचे तोडलेले एकुण ०४ सिल जु वा
६) २०० /- रु किमतीचा एक लोखंडी टॉमी जुवा
५५००/- रू कि.चा येणेप्रमाणे वरिल वर्णनाचा मुद्देमाल मिळुन आला, तसेच घटनास्थळाचे बाजुला जागामालक व सदरचे बेकायदेशिर कृत्य करणारा मुख्य आरोपी मंगेश सखाराम दाभाडे याने चोरी केले एटीएफ / जेट इंधन साठवणुक करुन ठेवण्यासाठी तयार केलेले पत्र्याचे शेडमधुन खालीलप्रमाणे वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
७) १,५०,०००/-रुपये किमतीचे अंदाजे २५०/- लिटर क्षमतेचे फ्लॅस्टीकचे एकुण ०५ बॅरल व ०१ लोखंडी बॅरल असे ०६ बॅरल त्यामध्ये एकुण १५०० लिटर एटीएफ / जेट इंधन १०० प्रती ली प्रमाणे अं किं
८) ८०००/- रु किमतीचे एकुण ०८ रिकामे बॅरल प्रत्येकी १०००/- रु किमतीचे जु वा
९) १०००/- रु किमतीचा एक हॅड पंप त्यास एका बाजुला बॅरल मधुन काढण्यासाठी लागणारा लोखंडी पाईप व दुसरे बाजुला प्लॅस्टीक पाईप लावलेला जु वा
१०) २०० /- रु किमतीचे एक पत्र्याचे बनवलेले नरसाळे जु वा
११) १००/- रु किमतीची लाल मुठ असलेली पक्कड जुवा
१२) १००/- रु किमतीचा हिरवी मुठ असलेला स्क्रू ड्रायव्हर जु वा
१३) १००/- रु किमतीचा बॅरेल खोलणेसाठी लागणारा लोखंडी पान्हा जु वा
१४) २०० /- रु किमतीची आईल मोजण्याची आकडे असलेली स्टीलची पट्टी जु वा
१,५९,७००/- रू कि.चा मुद्देमाल त्यामध्ये एटीएफ / जेट इंधनचे बॅरल, रिकामे बॅरल व एटीएफ / जेट इंधन काढण्यासाठीचे इतर साहित्य असे मिळुन आल्याने ते गुन्ह्याचे पुरावेकामी पंचांसमक्ष जप्त करण्यात आलेले आहे.
वरिल बेकायदेशिर प्रकाराबाबत तळेगाव पोलीस स्टेशन येथे आरोपी नामे १) मंगेश सखाराम दाभाडे वय ४२ वर्षे रा. भेगडे आळी शनिवार पेठ तळेगाव दाभाडे पुणे २) ईलाही सैफन फरास वय ४५ वर्षे रा. कलवड वस्ती मशिद जवळ फाळके चौक धानोरी पुणे ३) अनिल सतईराम जस्वाल वय २८ वर्षे रा. राणीसरांग आजमगड उत्तर प्रदेश ४) अमोल बाळासाहेब गराडे वय ३१ वर्षे रा. मुपो पिपंळ खुटे ता मावळ जि पुणे
५) परशुराम उर्फ सोन्या धोंडीबा गायकवाड वय ३६ वर्षे रा. दाभाडे वस्ती च-होली खुर्द ता खेड जि पुणे
याचेविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९, २८५, ५११, ३४ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन कडिल अधिकारी हे करीत आहेत. गुन्ह्याचे पुढिल तपासकामी सदर आरोपींची मा. न्यायालयाने दि. ११/०३/२०२४ पर्यंतची पोलीस कोठडी दिलेली आहे.
गुन्ह्यातील मुख्य आरोपी व जागामालक मंगेश सखाराम दाभाडे याचा पुर्वइतिहास
१) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ३९६ / २०२२ भा.दं.वि. कलम ३२४, ३४.
२) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ६८३ / २०१९ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)
३) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ३३० / २०१९ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)
४) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. २४७ /२०१६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई)
५) तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन गु.र.नं. ४५/२००८ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई)
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे साो, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. वसंत परदेशी साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, संदिप डोईफोडे, सपोआ, गुन्हे मा. श्री. सतिश माने यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट १, अतिरिक्त कार्यभार गुन्हे शाखा युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सपोनि संतोष पाटील, पोउपनि धनराज किरनाळे, सहा.पो.उप. नि. नारायण जाधव, संजय गवारे, पोहवा / प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, पोना/ वासुदेव मुंडे, पोशि/ प्रशांत सैद, चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.