आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

प्रतिबद्धता उपक्रमाच्या अनुषंगाने अँटनी ग्रूपच्या दोन कंपन्यांचा ‘अँटनी ग्रूप प्रीमियर लीग २०२४’ हा स्तुत्य उपक्रम..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ मार्च २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दक्षिण झोन येथे घरोघरचा कचरा गोळा करून वाहतूक करण्याचे कार्य करणारी अँटनी ग्रुपची कंपनी एजी एन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि. व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प यशस्वीपणे कार्यरत करत असलेली अँटनी ग्रूपची कंपनी अँटनी लारा रिन्यूएबल एनर्जी प्रा. लि. आपल्या कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकास व सर्वकष एकजुटीची नेहेमी काळजी घेत असतात.
यापूर्वी महिला दिनाच्या अनुषंगाने त्यांनी रांगोळी स्पर्धा, मेंदी स्पर्धा, पारंपरिक वेषभूषा, पारंपरिक नृत्य व होम मिनिस्टर असे कार्यक्रम आयोजित केले ज्यात कंपनीच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला.
यंदा अँटनी ग्रूपनं १८ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान “अँटनी ग्रूप प्रीमियर लीग २०२४” ह्या मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट प्रतियोगीतेचं आयोजन श्री. मदनलाल धिंग्रा मैदान, सेक्टर २५, प्राधिकरण येथे केलं आहे.
दि. १८-३-२०२४ रोजी अँटनी ग्रूप प्रीमियर लीग २०२४ चा शुभारंभ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. सहशहर अभियंता श्री. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व ट्रॉफीजचे अनावरण करून संपन्न झाला. ह्यावेळेस महानगरपालिकेचे मान. कार्यकारी अभियंता श्री परमजीतसिंग बन्सल तसेच दक्षिण झोन मधील ब, ड, व ग क्षेत्राचे मान. सहाय्यक आरोग्य अधिकारी अनुक्रमे श्री. महादेव शिंदे, श्री. शांताराम माने व श्री. कुंडलिक दरवडे हे उपस्थित होते.
ह्या प्रतीयोगीतेत एजी एन्व्हायरोच्या कर्मचाऱ्यांचे ६ संघ व अँटनी लाराच्या कर्मचाऱ्यांचे २ संघ, असे एकूण ८ संघांचा समावेश आहे.
ह्या प्रतियोगीतेचा अंतिम सामना दि. २६-३-२०२४ रोजी होणार आहे व ह्या प्रतीयोगीतेत गिफ्ट कुपन्स, ट्रॉफीज, प्रमाणपत्रे इत्यादी प्रकारची भरघोस बक्षिसे देखील कंपनीने जाहीर केली आहेत. अंतिम सामन्याच्या पुरस्कार वितरणासाठी देखील महानगरपालिकेचे मान्यवर अधिकारी उपस्थित असतील असे एजी एन्व्हायरोच्या तसेच अँटनी लाराच्या प्रकल्प प्रमुखांनी सांगितले. ह्या प्रतियोगीतेच्या यशाचे श्रेय कुणाला जातं असं विचारल्यावर, हे टीम वर्क असून ही संपूर्ण प्रतियोगीता व सर्व कार्यक्रम यांचे यशस्वी आयोजन करण्यात कंपनीचे प्रमोटर्स, डिरेक्टर्स, हेड ऑफिस, पीसीएमसी सी एन्ड टी प्रकल्पातील तसेच वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचा महत्त्वाचा वाटा आहे असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमा संदर्भात अनिरूद्ध सूर्यवंशी यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!