क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सलग तीन विजयासह हॉकी मणिपूर अंतिम आठ संघांमध्ये..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० मार्च २०२४ हॉकी मणिपूरने हॉकी उत्तराखंडवर ११-०२ असा सहज पराभव करताना सलग तिसर्‍या विजयासह सलग पूल जीमधून १४व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम आठ संघांमध्ये धडक मारली. आता बाद फेरीत त्यांची गाठ हॉकी महाराष्ट्रशी पडेल. क्वार्टरफायनल फेरी बुधवारपासून खेळली जाणार आहे.
मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत फॉर्मात असलेल्या हॉकी मणिपूरने मंगळवारी हॉकी उत्तराखंडवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. ब्रम्हचारीमायुम सरिता देवीचे (आठव्या आणि २४व्या मिनिटाला) मैदानी गोल, प्रभलीन कौरचे (१४ आणि ४५व्या मिनिटाला, पीसी) पेनल्टी कॉर्नरवरील आणि चिंगशुभम संगई इबेनहाईचे (५३व्या आणि ६०व्या मिनिटाला, पीसी) एका पेनल्टी कॉर्नरसह दोन गोल त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
हॉकी मणिपूरचा पूल जीमधून सलग तिसरा विजय आहे. त्यांनी एकूण ०९ गुणांसह आरामात बाद फेरी गाठली. उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवणारा तो आठवा आणि शेवटचा संघ ठरला.
पूल जीमधील इतर सामन्यामध्ये, हॉकी कर्नाटकने दादरा नगर आणि हवेली आणि दीव आणि दमन हॉकीचा १३-०० असा धुव्वा उडवला. कृतिकाचे (१५, २६व्या मिनिटाला-पीसी, ५६व्या मिनिटाला-पीसी, ५६व्या मिनिटाला-पीसी ) चार गोल करताना त्यात सिंहाचा वाटा उचलला. एम. जी. याशिकाने (२०व्या मिनिटाला-पीसी, ३८व्या मिनिटाला, ५८व्या मिनिटाला-पीसी) तीन गोल करताना तिला चांगली साथ दिली.
पूल एचमध्ये हॉकी हिमाचल आणि हॉकी राजस्थान यांच्यातील लढत ०४-०४ अशी बरोबरीत सुटली. हॉकी हिमाचलकडून धापा देवीने चौथ्या आणि ४९व्या मिनिटाला असे दोन गोल केले. रितू आणि भूमिका चव्हाणने प्रत्येकी दोन गोल केले. हॉकी राजस्थानकडून रीना सैनीने ४१ आणि ४८व्या मिनिटाला तसेच बलवंत रीना कंवरने २५व्या आणि ४०व्या मिनिटाला गोल करताना प्रतिस्पर्ध्यांना बरोबरीत रोखण्यात मोलाचा वाटा उचलला.
निकाल
पूल-एफ: हॉकी हिमाचल: ०४(धापा देवी चौथ्या, ४९व्या मिनिटाला-पीसी; रितू १७व्या मिनिटाला, भूमिका चौहान ५३व्या मिनिटाला) बरोबरी हॉकी राजस्थान: ०४ (बलवत रीना कंवर २५व्या मिनिटाला-पीसी, ४०व्या मिनिटाला; रीना सैनी ४१व्या मिनिटाला, ४८व्या मिनिटाला). हाफ टाईम: ०२-०१
पूल-जी: हॉकी कर्नाटक: १३(कृतिका एसपी १५व्या मिनिटाला, २६व्या मिनिटाला – पीसी., ५६व्या मिनिटाला-पीसी, ५६व्या मिनिटाला-पीसी. एम. जी. याशिका २०व्या मिनिटाला पीसी; ३८व्या मिनिटाला, ५८व्या मिनिटाला-पीसी; चंदना जे. ३३व्या मिनिटाला, ३७व्या मिनिटाला-पीसी; अदिरा एस ४३व्या मिनिटाला; प्रशु संघ परिहार ४८व्या मिनिटाला, अंजली एच. आर. ५५व्या मिनिटाला; गेडेला गायत्री ६०व्या मिनिटाला) विजयी वि. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हॉकी: 0. हाफ टाईम: ३-०
पूल-जी: मणिपूर हॉकी: ११(वर्तिका रावत 5व्या मिनिटाला; क्षेत्रिमायुम सोनिया देवी सातव्या मिनिटाला सातव्या; ब्रम्हचारीमयुम सरिता देवी आठव्या मिनिटाला, २४व्या मिनिटाला; प्रभलीन कौर १४वी-पीसी, ४५-पीसी; सनासम रंजिता ४४व्या मिनिटाला; चिंगशुभम संगई इबेनहाई ५३व्या मिनिटाला; ६०व्या मिनिटाला-पीसी; लिली चानू मतेंगबम ५७व्या मिनिटाला, चानू लचेंबी खुंद्रकपम ५९व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी उत्तराखंड: ०२ (कोमल धामी ३६व्या मिनिटाला; मोनिका चंद ४१व्या मिनिटाला). हाफ टाईम: ०५-००.

बुधवारी होणारे सामने..
उपांत्यपूर्व फेरी-०१: हॉकी मध्य प्रदेश वि. हॉकी पश्चिम बंगाल – दु. ०२.०० वा
उपांत्यपूर्व फेरी-०४: हॉकी हरियाणा वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा – सायं. ०२.०० वा.
उपांत्यपूर्व फेरी-०३: हॉकी झारखंड वि. हॉकी मिझोराम – सायं. ०६ वा.
उपांत्यपूर्व-०२: हॉकी महाराष्ट्र वि. हॉकी मणिपूर – रा. ०८.०० वा.

Captions:
M1 – Hockey Karnataka (Blue) vs Dadra & Nagar and Haveli Daman & Diu Hockey (Red)
M2 – Hockey Uttarakhand (Black) vs Manipur Hockey (White)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!