उत्सवदेश-विदेशपिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन तर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा.

आदिवासी अस्मिता, आदिवासी अभिमान

प्रतिनिधी नवनाथ बी सोनवणे पुणे चिखली, सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशन यांच्या वतीने आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि त्यांचे समाजाला दिलेले योगदान याचा यानिमित्ताने गौरव करण्यात आला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आदिवासी बांधवांच्या विकासासाठी फाउंडेशनने केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक झाले. शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन या विषयांवर यावेळी विशेष भर देण्यात आला.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत चव्हाण, सचिव ॲड. जयश्री सोनवणे, हर्षाली चव्हाण, उपाध्यक्ष ओमकार चव्हाण, खजिनदार द्रोपदी सोनवणे तसेच संस्थेचे पदाधिकारी संगीता बोरुडे, लताबाई चव्हाण, दत्तात्रय चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी फाउंडेशन सातत्याने काम करत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आदिवासींच्या हक्कांसाठी आणि अस्मितेसाठी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनचा हा उपक्रम समाजात एकोपा आणि अभिमानाची भावना निर्माण करणारा ठरला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button