गून्हानाशिकपोलिसमहाराष्ट्रविशेष

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीनां नाशिकरोड पोलीसांनी केली ०१ तासात अटक..

प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०४ ऑक्टोबर २०२५ दोन दिवसांपूर्वी दि. ०२/१०/२०२५ रोजी रात्रौ ११:१५ वा. चे सुमारास नाशिक रोड पो. ठाणे हद्दीत जाधववाडी गोरेवाडी नाशिक येथे राहणारा इसम नामे कृष्णा ठाकरे याचे मोईन शेख याचे सोबत ०२ दिवसापुर्वी झालेल्या भांडणाचे कारणावरुन आरोपी मोईन शेख, प्रकाश बारसे व ०२ विधिसंघर्षित बालक यांनी मयत कृष्णा ठाकरे यास मारहान करुन धारधार शस्त्राने वार करुन पळुन गेले होते. त्यानंतर मयत कृष्णा ठाकरे याची बहिण ज्याेती अहिरे हिने त्यास उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले. त्याच वेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक जितेंद्र सपकाळे, सपोनि सुर्यवंशी, सपोनि कोरडे, व गुन्हे शोध पथकाचे अमंलदार घटनास्थळावर दाखल झाले. त्यावेळी सपोनि सुर्यवंशी / सपोनि कोरडे व गुन्हे शोध पथक यांनी घटनास्थळावर तपासाचे कौशल्य वापरुन मानवी व तात्रिक संसाधनाचा वापर करुन यातील आरोपीची नावे निष्पन्न केली.
त्यानंतर वपोनि जितेंद्र सपकाळे यांनी सपोनि सुर्यवंशी व सपोनि कोरडे यांचे गुन्हे शोध पथकातील अमलदार यांचे ०२ पथके तयार करुन यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेशित केले. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे पो.ह विशाल पाटील, पोशि महेंद्र जाधव, पोशि योगेश रानडे, पो.शि. अरुण गाडेकर, पो.शि. सागर आडणे, पो.शि. रोहित शिंदे यांनी आरोपीचां तात्काळ उपनगर व नाशिक रोड परिसरात शोध घेवून रात्रीच्या वेळी आरोपी नामे मोईन शेख व प्रकाश उर्फ अशु बारसे व ०२ विधिसंघर्षित बालक यांना ताब्यात घेतले.
त्यानंतर यातील मयत याचे बहिण ज्योती अहिरे यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास सपोनि कोरडे व पो. शि. सचिन रिपोटे हे करीत आहेत.
नाशिक रोड पोलीसांनी उत्कृष्ठ कामगिरी करत गुन्हा घडल्याचे वेळेपासुन ०१ तासाचे आत गुन्हा दाखल होण्याचे आधी आरोपीचे नावे निष्पन्न करुन त्यांना तात्काळ ताब्यात देखिल घेतल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळविले व परिसरात शांतता प्रस्थापित केली.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, श्री. किशोर काळे व मा. सहायक पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग, नाशिक डॉ. सचिन बारी यांचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक श्री. बडेसाब नाईकवडे, तसेच गुन्हे शोध पथकाचे सपोनि प्रविण सुर्यवंशी, तसेच गुन्हे शोध पथकाचे पोह विशाल पाटील, पो.शि. महेंद्र जाधव, पो.शि. योगेश रानडे, पो.शि. सागर आडणे, पो. शि. रोहित शिंदे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!