देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

मावळ लोकसभा ३५ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ०३ उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले.      

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २७ एप्रिल २०२४ मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने ३५ उमेदवारांचे नामनिर्देशन वैध ठरले असून ०३  उमेदवारांचे नामनिर्देशन अवैध ठरले आहे. तर  ५० नामनिर्देशन पत्रांपैकी ४६ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून ०४ नामनिर्देशन पत्रे अवैध ठरली आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन प्रशासकीय इमारत, आकुर्डी येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये मुदतीत ३८ उमेदवारांनी  ५०  नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. या नामनिर्देशन पत्रांची आज छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी वैध आणि अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची घोषणा केली. मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक निरीक्षक श्री. बुदिती राजशेखर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या छाननी प्रक्रियेवेळी नामनिर्देशन पत्रे दाखल करणारे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित  होते.
 
नामनिर्देशन पत्रे  वैध  ठरलेल्या  उमेदवारांची नावे
यशवंत विठ्ठल पवार, प्रशांत रामकृष्ण भगत, श्रीरंग चंदू बारणे, इंद्रजीत डी. गोंड, ज्योतीश्वर विष्णू भोसले,  मुकेश मनोहर अगरवाल, रफीक रशीद कुरेशी, प्रफुल्ल पंडीत भोसले, संजोग भिकू वाघेरे, गोपाळ यशवंतराव तंतरपाळे, माधवी नरेश जोशी, संतोष मगरध्वज उबाळे, महेशसिंग नारायणसिंग ठाकूर, मधुकर दामोदर थोरात, राहुल निवृत्ती मदने, तुषार दिगंबर लोंढे, शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, पंकज प्रभाकर ओझरकर, मनोज भास्कर गरबडे , उमाकांत रामेश्वर मिश्रा, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, इकबाल इब्राहिम नावडेकर, अजय हनुमंत लोंढे, गोविंद गंगाराम हेरोडे, राजू लालसो पाटील, दादाराव किसन कांबळे, चिमाजी धोंडिबा शिंदे, राजेंद्र मारूती काटे, राजाराम नारायण पाटील, हजरत इमामसाहब पटेल, मारूती अपराई कांबळे, संजोग रविंद्र पाटील, रफिक मैनुद्दीन सय्यद, भाऊ रामचंद्र आडागळे.

नामनिर्देशन पत्रे  अवैध  ठरलेल्या  उमेदवारांची नावे
संजय सुभाष वाघेरे (स्वतःचे नाव असलेल्या मतदार यादीची मूळ प्रमाणित प्रत सादर केली नाही  ), राजेंद्र मानसिंह छाजछिडक (शपथपत्र दोषपुर्ण), विजय विकास ठाकुर (अनामत रक्कम भरली नाही).
दरम्यान, गोपाळ तंतरपाळे यांनी दाखल केलेल्या 3 नामनिर्देशन पत्रांपैकी  1 नामनिर्देशन पत्र पक्षाच्या वतीने भरले होते. त्या अर्जासोबत पक्षाचा ए बी फॉर्म जोडला नसल्याने ते नामनिर्देशन पत्र अस्वीकृत करण्यात आले. मात्र त्यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेले नामनिर्देशन पत्र वैध ठरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!