प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पूणे दि. २७ एप्रिल २०२४ अनहद सोशल फाऊंडेशनच्या ‘राईट टू लव्ह’ उपक्रमांतर्गत: ‘आंतर्जातीय विवाह : एक सामाजिक क्रांती’ विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे २२ निबंध आमच्याकडे आले. आज या स्पर्धकांची यादी आपल्यासमोर जाहीर करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या उत्साहाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेली ही निबंध स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रांमधून उत्साही स्पर्धकांनी या विषयावर आपले विचार मांडले. आम्ही या स्पर्धेतील सर्व सहभागींची यादी आज जाहीर करीत आहोत.
- मयूर घाग, रायगड
- नितीन पासलकर, दौड-पुणे
- भारत भोसले, अहमदनगर
- तेरेजा परेरा, पालघर
- निहारिका तिवारी, वसई- मुंबई
- राधाकृष्ण व्हनमाने, पिंपरी-चिंचवड
- अजय कटरे, धुळे
- ऋषिकेश कोकरे
- मयूरी गोसावी, पुणे
- लता खडसे मूंबई
- भरती गोरल, बेळगाव
- ज्योती काटे, सोलापूर
- संकेत झगेकर, नागपूर
- अंकिता पाटील, सिंधुदुर्ग
- श्वेता चौगुले, बेळगाव
- मोनाली भाकरे, चंद्रपूर
- पर्णवी डबरे, लातूर
- शिवानी अबनवे, पुणे
- मानसी माने, कल्याण
- राणी ढाकने, छ. संभाजी नगर
- अक्षदा बांबळे, आंबेगाव-पुणे
- निखिल सूर्यवंशी, जळगाव
आम्ही सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी या महत्वपूर्ण विषयावर आपले मौलिक विचार आपल्या लेखणीतून मांडले. आमच्या या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे आभार !
तुमच्या सहभागाने आणि सहकार्याने आपण सामाजिक समानता व न्यायाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. या स्पर्धेचा निकाल २८ एप्रिल रोजी संध्या. ०६ वा. जाहीर करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील निबंधाचे परीक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागातील देवकुमार अहिरे सर करणार आहेत. त्यांचा या विषयांवर सखोल अभ्यास आहे.