
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ मे २०२४ पूर्वापार हा राजकीय संघर्ष दोन विचार धारेमधील सातत्याने चाललेला सामाजिक संघर्ष आहे. समता आणि विषमता यातील हा खऱ्या अर्थाने चाललेला, श्रेष्ठत्व वादासाठीचा संग्राम आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय, या विचार धारेवर, मानवाला माणूस बनवून, गुलामगिरी लाथाडून स्वाभिमानाने जगा अशी सांगणारी व शिकवण देणारी विचारधारा म्हणजे बहुजनांचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न, लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे, व प्रबोधनकार ठाकरे यांची विचार धारा समतेची आहे.
तर ज्यांना, ज्या विचार धारेला वर्णव्यवस्था, चतुर्यवर्ण, जातीयता मान्य असून, समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, नाकारणारी विचार धारा म्हणजेच विषमतावादी विचार धारा, या विचारधारेचे पुरस्कर्ते, म्हणजेच हिंदुत्वाची विचारधारा नसून वैदिक विचारधारा होय. या विचार धारेचे प्रमुख गोळवलकर गुरुजी, व ती विचारधारा राबविणारी या देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ही संघटना व तिचे राजकीय पिल्लू भारतीय जनता पक्ष, आणि संघाच्या छोट्या मोठ्या संघटना, या संघटना व पक्ष जो पर्यंत या देशात कार्यरत आहेत, तो पर्यंत
हा देश व देशातील जनता सुखी, समाधानी, गुण्यागोविंदाने नांदू शकणार नाहीत, आणि देशाचा विकास होणार नाही.
कारण ही विषमता वादी विचारधारा गोळवलकर गुरुजींच्या विचारधारेवर आधारित आहे. गोळवलकर गुरुजी आपल्या banch of thought, ( विचारांचा गुच्छ ) या पुस्तकातील पान न.९५ ते ९७ मध्ये उच्च, जाती वर्गाला म्हणतात, की, आपला वैदिक धर्मीय समाज हा अल्प संख्येने आहे, त्यांचे श्रेष्ठत्व जर अबाधीत ठेवावयाचे असेल, तसेच सर्व बाबतीत आपले वर्चस्व आणि सत्ता राखून ठेवावयाची असेल, तर इतर सर्व समाजाला गुलामीत बंदीस्त करावे लागेल, त्या साठी हा देश ९५ % तहस -नहस करुन मोडून टाकला पाहिजे, म्हणजे देशातील जनतेने फक्त आपले पोट कसे भरेल, याच विचारात तणावात राहिले पाहिजेत, त्यांना ज्यादा विचार करण्यास वेळच मिळनार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.
याच दृष्टीकोनातून केंद्रात सध्या २०१४ पासून आलेले भाजपाचे सरकार मार्गक्रमण करीत आहे. हे केंद्रातील भाजपाचे सरकार पूर्णतः संविधान विरोधी सरकार आहे. असे त्यांच्या सरकार चालविण्याच्या विविध प्रकारच्या लक्षणांवरून सहज दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला २६ नोव्हेंब १९४९ रोजी संविधान अर्पण केले, तेव्हापासूनच आर. एस. एस. ही संघटना, केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान लिहले आहे. म्हणून ते आम्हाला मान्य नाही, कारण त्यांच्या मनू स्मृतीत लिहले आहे की, शूद्र, अति शूद्र कधीच वैचारिक दृष्टया श्रेष्ठ ठरू शकत नाहीत, तसेच शूद्रांच्या राज्यात वैदिक ब्राह्मणांनी राहू नये, म्हणून गोळवलकर गुरुजींच्या विचार धारे प्रमाणे हे सरकार चालत आहे, असे का म्हणू नये.?
हे केंद्र सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाही, या सरकारने शेतकरी आंदोलनावर लाठी चार्ज व गोळीबार केला, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या, या सरकारने बेरोजगारी वाढवली आहे हे सरकार, शासकीय उधोगधंदे बंद करून त्यांचे खाजगीकरण करत आहे. मोठं मोठे उधोग शासकीय प्रकल्प, तोट्यामध्ये दाखवून ते खाजगी उधोगपतीला विकित आहे, रेल्वे, विमान सेवा, मोठं मोठी हॉस्पिटल, शासकीय शैक्षणिक संस्थाचे खाजगीकरण करून, मागासवर्गीय समाजाचे संविधानाला बगल देऊन या सरकारने O B C, S C, N T, V J N T, इत्यादी अल्पसंख्य मागासवर्गीय समाजाचे आरक्षण नाकारून मोडीत काढले आहे, त्यामुळे या देशातील गोर गरीब, मध्यमवर्गीय, तसेच महिला वर्ग सर्वच बाबतीत त्रस्त आहेत, महागाईने तर सर्वच बाबतीत कहरच केला आहे, महिला स्वयंपाकगृहात त्रस्त आहेत, बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा, तसेच सबका साथ सबका विकास इत्यादी अनेक खोटे, लबाड, नारे देऊन हे सरकार सत्तेवर आले, आणि आत्ता परत २०२४ ला हे सरकार जर सत्तेवर आले तर यापुढे निवडणूका होतील की नाही हे सांगता येत नाही, कारण हे सरकार फॅसिस्ट विचारधारेचे सरकार आहे, त्यांना लोकशाही, प्रजासत्ताक, सविधानावर आधारित समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्यायावर आधारित हे भारतीय संविधान नको आहे, त्यांनी मनु स्मृतीवर आधारित संविधान तयार करून ठेवले आहे. त्यांना वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था परत या देशात आणावयाची आहे, म्हणून ते भारतीय नागरिकांचे जीवन मरणाचे मूलभूत प्रश्न सोडवाव्याचे सोडून, धार्मिक दंगे, हिंदू मुस्लिम दंगे, हिंदू दलित दंगे, बौद्ध मुस्लिम दंगे घडवून आणून, फोडा फोडीचे राजकारण करून, तिसऱ्या वेळी ही केंद्राची सत्ता हस्तगत करू पाहत आहेत.
या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित, समता स्वातंत्र्य, बंधुभाव, सामाजिक न्याय व सर्व धर्मसमभाव या वैचारिकतेवर आधारित एकच राष्ट्रीय पक्ष आहे, आणि तो म्हणजे इंडियन राष्ट्रीय काँग्रेस, या पक्षाने भौगोलिक दृष्टीकोनातून देशाचा विकास केला, तसेच या भारत देशाला, देशातील सर्व लहान थोर, महिला, पुरुष वर्ग यांचा विकास करून, सत्तेचे विकेंद्रीकरण करुन, शासकीय संस्था, उधोग धंदे उभारले, आणि जे जे काँग्रेस ने निर्माण केले ते सर्व या भाजपाच्या खुनशी सरकारने विकले किंवा खाजगीकरण करून मोडीत काढले,
लोकशाही व्यवस्थेत बहुमत असणाऱ्या सरकारला जनतेप्रति, देशाप्रती जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष हवा असतो, या केंद्र सरकारला तो मूळातच नको आहे. म्हणून ईडी, सी. बी. आय., चा धाक दाखवून विरोधी पक्ष फोडून ते आपल्यासोबत जोडून घेतले जात आहेत, हे आपण आज डोळ्यांनी पहात आहोत, यांना कसलीच लाज, अब्रूची चाड राहिलेली नाही. यांनी लोकशाहीचे चारही स्तंभ गिळंकृत केले असल्याचे दिसून येते, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. सरकार विरोधी गरिबांच्या कल्याणाचे प्रश्न उपस्थित केले तर राष्ट्रद्रोहा खाली खटला भरला जातो.
यासाठी यावेळी २०२४च्या सूरू असणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत केंद्रातील भाजपाचे सरकार घालवून त्याठिकाणी देशात इंडिया आघाडीचे सरकार, तसेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणने हे कोण्या दलबदलू, खोके घेऊ नेत्यांच्या हाती नसून ते तुमच्या आमच्या, डोळस मतदार राजाच्याच, हाती आहे.
असे आमच्या सोबत बोलताना भीमरत्न, प्रा. बी. बी. शिंदे , संस्थापक / अध्यक्ष :–सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना ( महा. राज्य) तसेच अध्यक्ष- झोपडपट्टी सेल, आय काँग्रेस, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा यांनी सांगीतले.
पूढे ते बोलले की मी आपणास नम्र विनंती करतो की, आत्ता यावेळी कोणाच्याही भूल थापाला, बळी न पडता, लाचारी सोडून स्वाभिमानाने, जागृत राहून, मावळ लोकसभा मतदार संघात लोकप्रिय महाविकास आघाडीचे खासदार मा. संजोग वाघिरे पाटील यांच्या मशाली पुढील बटन दाबून तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे लोकप्रिय, अनुभवी अभिनेते, डॉ. अमोल कोल्हे यांच्या माणसांनी वाजवीत असलेल्या तुतारी पुढील बटन दाबून, भरघोस मतांनी विजयी करून लोकसभेत पाठवायचे आहे.
कारण भाजपाला केंद्राच्या सत्तेतून पायउतार करून, त्या केंद्रस्थानी काँग्रेसला, मान्यवर राहुल गांधींना प्रधानमंत्री झालेले डोळ्यांनी पहावयाचे आहे. तरी न चुकता वेळेत मतदान करून, भारतीय सविधाना प्रमाणे आपला मतदानाचा हक्क बजावू या व लोकशाही आणि संविधान जिवंत ठेऊ या.



