
प्रतिनिधी सतिश पाटील मुबंई दि. ११ सप्टेंबर २०२६ महाराष्ट्राला योगदान दिलेले नसताना फक्त राजकीय पोळी मराठी विरोधात हिंदी भाषेला खतपाणी घालण्याचे काम सत्तेतील सरकार करीत आहे! “देखो तुम्हारे लिए फंक्शन रखा है व्होट अपन को ही देना है,” असे भासवून महाराष्ट्राला कमी लेखण्याचे षडयंत्र राबवले जात असता महाराष्ट्रातील एकही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, संघटना पुढे येत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल, मुंबई साठी १०७ हुतात्मा प्राणाची आहुती दिली होती याचा आज विसर पडावा ही खेदजनक बाब आहे. त्यावेळी मोरारजी देसाई मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा हुकुम सोडला होता. १०७ हुतात्म्या मुळे मुंबई वाचली आहे . आजही मोरारजीचे स्वप्न पुर्ण कराण्यासाठी धडपड, षडयंत्र सूरूच आहे.
महाराष्ट्राशी काहीही संबंध नसलेले हिंदी भाषीक नेते नवी मुंबई मध्ये हिंदी भाषा संमेलन आयोजित करतात याला विरोध करत मराठी एकीकरण समिती शिष्टमंडळाने काल पोलीस प्रशासनाला निवेदन पत्र देऊन असे भाषिक आणि प्रांतिक वाद वाढविणारे कार्यक्रम मराठी राज्यात घेऊ नये अशी मागणी केली.
हिंदीला अनेक राज्य आहेत उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि अनेक पण मराठीला एकमेव महाराष्ट्र राज्य आहे तिथे सुद्धा राजकीय स्वार्थ आणि मतांची गोळाबेरीज करण्यासाठी भाषिक अतिक्रमण करत रहायचे. १४ सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू होतोय त्यात खोडा करायला असे कार्यक्रम आयोजित केले जातात.
राज्यात खासकरून मुंबईमध्ये असे प्रकार मुद्दाम सुरू केलेत यांना राज्याला हिंदी भाषिक राज्य करायचे आहे, मोठे षडयंत्र सुरू आहे, कधी पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न करणार, रिक्षा टॅक्सी मराठी सक्तीला मुदत वाढ देणार आणि याचसाठी हे मराठीला विरोध करत हिंदी भाषिक संमेलन घेत आहेत.
असे एकीकरण समिती शिष्टमंडळाने निवेदनात नमूद केले आहे.



