आरोग्य मंत्री तानाजी सावंत राजीनामा द्या.. राजन नायर राज्य सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ ऑक्टोंबर २०२३ भारतीय जनता पार्टी नेहमीच निवडणूक जवळ आली की अनेक वेगवेगळ्या बाबतीत बोलतात, आश्वासने देतात जसे की, चांगले शिक्षण, गोरगरिबांना घरे, बेरोजगारांना नोकरी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य सुविधा या सर्व गोष्टी बोलून जनतेला खोटी आश्वासनं देऊन दिशाभूल करतात व सत्तेत येतात.
सद्य परिस्थितीत भारतीय जनता पार्टी केंद्र आणि महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार व तीन ड्रायव्हर सरकार जनतेला चांगल्या सुखसुविधा देण्याच्या व्यतिरिक्त पार्टी फोडण्याचा, फितुर नेत्यांना पद देण्याचे काम, कोणाला त्रास द्यायचा अशा अनेक निरुपयोगी गोष्टी चालू आहेत की, ज्याचा उपयोग जनतेला काहीच नाही. महाराष्ट्र राज्य तर नुसती अराजकता माजली आहे स्वतःच्या पक्षाचा आणि नेत्यांचा विकास करून घेत आहेत.
मी या सर्व गोष्टी यासाठी व्यक्त करितो की, जेव्हा नरेंद्र मोदी सरकार निवडून आले त्यानंतर २०१७ साली यु.पी. गोरखपूर मध्ये योगी आदित्यनाथ सरकार असताना बी.आर.डी. वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात ऑक्सीजन पुरवठा कमी पडल्याने अनेक बालरूग्ण मृत्यूमुखी पडले. त्यानंतर हरियाणा मध्ये अशा प्रकारची घटना घडली होती.
आता तशीच घटना महाराष्ट्रातील नांदेड, विष्णुपुरी येथील कै.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाच्या एन. आय. सी. यू. व आयसीयू मध्ये नवजात पालकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा वाणवा आहे विशेष म्हणजे मागील ४८ तासांत ३१ पैकी तब्बल १६ बालकांचा मृत्यू होऊन देखील वातानुकूलित कक्षात पंखे व एसी बंद आहे व अधिकारी यांच्या दालनात एसी व पंखे चालू आहेत.
ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे त्या भागात अशा प्रकारच्या घटना घडतात नागपूर, संभाजीनगर घाटी हाॅस्पिटल, ठाणे, अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या पण त्यावर कोणत्याही प्रकारे अमलबजावणी केली गेली नाही.
पन्नास खोके शिंदे सरकारचा खासदार हेमंत पाटील याने एका हाॅस्पिटल चे डीन की ज्यांचा आम्ही सन्मान करतो त्यांना जबरदस्तीने, सरकार व खासदार पदाचा धाक दाखवून त्यांच्याकडून टाॅयलेट स्वच्छ करून घेण्याचा मनुवादी विचार ठेवून त्यांचा अपमान केला. तानाजी सावंत यांना भिती दाखवून काम करून घेतले मला एक गोष्ट समजत नाही की, भारतीय जनता पार्टी ने शाहू, फुले, आंबेडकर या महान व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत चूकिचे वक्तत्व केले आणि अशा प्रकारच्या सरकारचे, पार्टीचे खासदार सन्माननीय डीन जे आज कष्ट, त्रास, अपमान सहन करून आज ते या पदावर काम करताना त्यांना टाॅयलेट स्वच्छ करण्याचे काम भिती दाखवून करून घेतले.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी काय विचार केला पण आज महाराष्ट्रात काय होत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनीचे महाराष्ट्रासाठी काय स्वप्न होते, फुले यांनी सुशिक्षितता समाजात आणून देखील आज सत्तेत असलेल्या पक्षाने भारतीय जनता पार्टीने काय करून ठेवले आहे. आज समाजावर सत्ता लोभी लोक वर्चस्व करून आहेत. या सर्व गोष्टी व्यक्त करून तानाजी सावंत याच्या बाबत दोन इंजिन तीन ड्रायव्हरच्या सरकारला विनंती करितो की अशा असक्षम असलेल्या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य महासचिव राजन नायर व्यक्त कले.



