अन्यथा बहुजन समाज पार्टी राज्यभर आंदोलन करणार
पिंपरी पुणे (दि ३० मे २०२४) – बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते विजय वाघमारे यांचा १५ मे रोजी संशयास्पद मृत्यू झाला असून या घटनेस जबाबदार असणाऱ्या स्थानिक गावगुंड, राजकीय नेते यांच्यावर गुन्हे दाखल करून सीआयडी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी प्रदेश सचिव सुदीप गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, महंमद शफीक, सागर जगताप आदी उपस्थित होते.
दिवंगत विजय निवृत्ती वाघमारे हे सन २००६ सालापासून बहुजन समाज पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून काम करत होते. २००७ साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्थेची व २००९ साली चिंचवड विधानसभेची निवडणूक बहुजन समाज पार्टीकडून लढविली होती. सामाजिक व राजकीय काम करीत असताना दिवंगत विजय निवृत्ती वाघमारे यांनी आपल्या वाकड येथील वडिलोपार्जित महार वतनाच्या जागेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करीत जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
खोट्या केसेस टाकून विजय वाघमारे यांना दोन वेळा तडीपार करण्याचा प्रयत्न पोलिसांनी विरोधी लोकांच्या संगनमताने केला. परंतु बेकायदेशीर रित्या दाखल केलेल्या खोट्या गुन्हा यांच्या आधारे विजय वाघमारे यांना तडीपार करू पाहणाऱ्या विरोधी लोकांना (विकासक व गावगुंड) व भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांना यश आले नाही. इतके सारे प्रयत्न करून देखील विजय वाघमारे दबत नाही, भीत नाही म्हणून पोलीस प्रशासनाने विजय वाघमारे यांना त्यांच्या वडिलोपार्जित जागेतून बाहेर काढण्यासाठी अमानुष मारहाण केली, या संदर्भातील केस मानवी हक्क आयोगाकडे सध्या चालू आहे. या केसचा निकाल २२ जुलै २०२४ रोजी प्राप्त होणार आहे.
वाकड येथील कात्रज – देहूरोड बायपास महामार्गालगत विजय वाघमारे यांच्यासह संपूर्ण वाघमारे भावकीची सुमारे ७० एकर महार वतन जागा आहे. ही जागा वाघमारे व त्यांच्या भावकीतील वाड-वडिलांनी कुठल्याही प्रकारचे गहाण खत, खरेदी खत, बक्षीस पत्र केलेले नसताना ही जागा वाकड येथील प्रस्थापित गाववाल्यांच्या नावे सातबारा नोंदी झाल्या आहेत. या ७० एकर जागेपैकी ३५ एकर जागेवर सध्या बांधकाम झाले आहे.
सदर जागेच्या प्रकरणी जिल्ला अधिकारीयाकडे विजय कागदपत्रांच्या आधारे आपल्या नावे केली आहे हे करणदोषली सिद्ध आले. या प्रकरणांमध्ये मानव अनुसूचित जाती आयोग यांनी विजय वाघमारे यांच्या बाजूने आदेश दिला. यासंदर्भात विजय वाघमारे यांनी व्यायालयामार्फत रावणूक करणाऱ्या स्थानिक गावागावांधकाम व्यावसाविक यांच्यावर अनुसूचित जाती (अट्रोसिटी) कायद्यानुसार १२ लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या गोष्टीमुळे स्थानिक गावगुंड, जागा विकसक बांधकाम व्यवसायिक यांनी विजय वाघमारे यांना धमकावणे, त्रास देने, पोलिसांमार्फत खोटे गुन्हे दाखल करणे अशाप्रकारे अस देण्यास सुरुवात केली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी बहुजन समाज पार्टीने दिवंगत विजय निवृत्ती वाघमारे यांना माल लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती परंतु काही तांत्रिक कारणांमुळे विजय निवृत्ती वाघमारे यांना निवडणूक लढविणे शक्य झाले नाही. १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाचच्या सुमारास विजय निवृत्ती वाचनारे हे मतदानासाठी बाकड येथील मतदान केंद्रावर आपल्या फोर व्हीलर गाठी मध्ये मतदान करण्यासाठी गेले असता गाडी पार्किंग करण्यावरून पोलिसांशी वाद झाला. यानंतर विजय वाघमारे तेथून मतदान करता निघून गेले व पुन्हा काही वेळाने मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आले असता पॉलिसांनी विजय वाघमारे यांना कुठलेही कारण न सांगता गाडीतून उत्तरवून मारहाण करण्यास सुरुवात केली. सुमारे १०१५पोलीस विजय वाघमारे यांना काठीने, रायफला च्या लाकडी दस्त्याने व खाली पाडून लाथांनी मारहाण करीत होते. ही मारहाण साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटे चालू होती. यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचा पुतण्या कुणाल वाघमारे याने त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन विजय वाघमारे यांना तिथून घेऊन गेले. भर चौकात पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे विजय वाघमारे यांना अपमानास्पद भावना वाटू लागली व त्यांनी ती आपल्या घरच्यांनाही बोलून दाखविली.
१५ मे २०२४ रोजी विजय वाघमारे हे सकाळी सात वाजता आपला मोबाईल फोन घरात ठेवून पायीच घरातून बाहेर पडले. यानंतर पाक मायाणातील त्यांच्या जुन्या परा शेजारील हाडकीतील मोकळ्या जागेमध्ये सुमारे अडीच ते तीन च्या दरम्यान त्यांच्या कुटुंबातील सदस्याना ते निपचित पडलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांना त्याचा येथील प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्यानंतर कुटुंबाने त्यांना औंध येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. यानंतर वाकड पोलीस स्टेशनवीनाम्या सुरुवात केली आ पंचनामा व पोस्टमार्टम करण्याची केली. यानंतर मृतदेह साधारणपणे रात्री स अकराच्या दरम्यान सायल करण्यात आला. १६ में २०२४ पोलिसांनी तहसीलदार इनाम पोस्टमार्टमची मागणी नाका सर्वसाधारणपणे पंचनामा पोस्टमार्टम करण्याचा प्रयत्न केला. याला बहुजन समा पार्टीच्या उपस्थित पाकिनीविरोधानंतर ससूनालयाचे डीन भेट घेत इन कॅमेरा पंचपोस्टमार्टम करण्याची मागणी केली. तसे यासंदर्भात पि विडचे पोलीस आयुक्त दिनकुमार भौयांनादेखील या प्रकरणाची बहुजन समा माटीच्या शिष्टमंडळाने घेत माहिती दिली. या मेटी दरम्यान पोलिसांनी १३ केलेल्या अमानुष मारहाणीमुन्ना दाखल करण्याची मागणी के परंतु पोलीस आयुक्तांनी पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करुया दिले. या प्रकरणांनो याची मागणी देखील पिंपरी पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. तहसीलदारांनी आम्ही आदेश देऊ शकत नाही, असे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले. त्याऐवजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या समोर इन कॅमेरा पंचनामा व पोस्टमार्टम करण्याचे आश्वासन दिले.
यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर इन कॅमेरा पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आला. विजय वाघमारे यांचा मृतदेह १७ मे रोजी रात्री साडेबारा वाजता कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला व त्याच दिवशी रात्री अडीच वाजता विजय वाघमारे यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
प्राथमिक पोस्टमार्टम चा रिपोर्ट मध्ये विजय वाघमारे यांच्या शरीरावर भरपूर जखमा असल्या कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी नमूद केले. यासंदर्भात पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे विजय वाघमारे यांचा मृत्यू झाला असे आम्ही पोलिसांना सांगितले परंतु पोलिसांनी याच्यावर कुठलीही कारवाई न करता पोस्टमार्टम चा क्युरी रिपोर्ट आल्यानंतर गुन्हे दाखल करू असे आम्हाला व कुटुंबियांना सांगितले. पोस्टमार्टम चा क्युरी रिपोर्ट आल्यानंतर सदर रिपोर्ट मध्ये बेबनाव करण्यात आला असे आमचे ठाम मत आहे.
कालपर्यंत कुटुंबातील लोकांच्या फिर्यादी प्रमाणे एफ आय आर नोंदविण्यात आली नव्हती परंतु पोलिसांनी जबरदस्तीने काल २९ मे २०२४ रोजी पोलिसांच्या सोयीप्रमाणे एफ आय आर नोंदवण्यात आली. याची तक्रार विजय वाघमारे यांचे पुतने विशाल वाघमारे यांनी पोलीस आयुक्तांना २९ मे २०२४ रोजी केली आहे.
संघटनेने उपस्थित केलेले ठळक मुद्दे –
१) १३ मे २०१९ रोजी मतदानाच्या दिवशी पोलिसांनी विजय वाघमारे यांना अमानुष मारहाण केली असता ते गंभीर जखमी झाले होते तरीसुद्धा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई का नाही?
२) औंध येथील जिल्हा रुग्णालयामध्ये खोटी खबर देऊन पंचनामा करण्याचा पोलिसांनी प्रयत्न का केला?
३) मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तेथील स्पॉट पंचनामा दहा दिवसांनी का करण्यात आला?
४) महारवतनाच्या जागेवरून विजय वाघमारे यांचे स्थानिक गावगुंड, विकसक व बांधकाम व्यावसायिक यांच्याशी वाद असताना देखील या प्रकरणांमध्ये त्यांची चौकशी का करण्यात आली नाही?
५) ससून हॉस्पिटलमध्ये पंचनामा करीत असताना कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणांमध्ये हेराफेरी करणाऱ्या डॉक्टर अजय तावरे सुट्टीवर असताना देखील पोस्टमार्टम च्या ठिकाणी कशासाठी आले होते?
६) डॉक्टर तावरे सुट्टीवर असताना देखील पोस्टमार्टमच्या क्युरी रिपोर्टवर त्याची सही कशी काय?
७) १५ मे रोजीचे डॉक्टर अजय तावरेचे कॉल रेकॉर्डिंग पोलिसांनी तपासून घ्यावे.
८) पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये हेराफेरी केल्याचा आमचा दाट संशय आहे, त्या अनुषंगान पोलीस तपास करणार आहेत काय?
९) वाघमारे कुटुंबीयांच्या जबाबाप्रमाणे फिर्याद नोंदवून न घेता पोलीस कोणाला का पाहत आहेत?
१०) इतका गंभीर प्रकार घडलेला असताना देखील पोलीस इतक्या संथगतीने तपास करीत आहेत?
११) पोलीस अधिकाऱ्यांचे देखील कॉल रेकॉर्ड तपासण्यात यावी ही आमची मागणी आहे.
१२) सदर प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा सीबीआय मार्फत करण्याची मागणी आम्ही करीत आहोत.
१३) पोलिसांनी सादर केलेल्या क्युरी रिपोर्ट प्रमाणे विजय वाघमारे यांना मृत्यूपूर्वी तीन वेळा मारहाण झाली आहे या मारहाणी मागे नक्की कोणाचा हात आहे हे पोलिसांनी का तपासले नाही?
१४) प्रथमदर्शनी तरी हा वाद महार वतनाची जागा बळकाऊ पाहणाऱ्या लोकांकडूनच घातपात झाल्याशी दाट शक्यता आम्हास वाटते. या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे काय?
१५) महार वतनाच्या जागा बळकाविण्याचे फार मोठे नेटवर्क पुणे जिल्ह्यात सक्रिय आहे याच्यावर सरकार व पोलीस यंत्रणा चाप बसवणार आहेत की नाही?
दिवंगत विजय निवृत्ती वाघमारे यांची हत्या करणाऱ्या नराधमांना शिक्षा होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आगामी काळात मोठे जन आंदोलन उभे करून न्याय मिळविण्यासाठी संघर्ष करणार आहोत, असे चलवादी यांनी सांगितले.