आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

डॉ. किशोर मोडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी – पोलिस हवालदार कैलास लबडे

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि.२७ मार्च २०२४ संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथील डॉक्टर डॉ. किशोर मोडकर यांनी आर्थिक हितापोटी माझी आई जनाबाई बंसीलाल लबडे (वय ७३ वर्ष) यांच्या जीवाला धोका निर्माण होईल असे वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी अशी मागणी पोलीस हवालदार कैलास लबडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पत्राद्वारे केली आहे. या वेळी ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भा.वी. कांबळे पत्रकार कक्षात पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी प्रशांत शितोळे, सौ. संगीता ताई वानखेडे, श्री राजेश बागुल, संतोष मेहत्रे, कैलास लबडे, रवींद्र लबडे, शोभा चव्हान, जाहिन अंसारी, ओमकार लबडे इत्यादी उपस्थितीत होते.
या वेळी लबडे म्हणाले की, आईचा उजवा पाय ७ महिन्यापूर्वी हेवी शुगर मूळे घुडग्याखालुन कापलेला आहे.त्याच पायावर २४ फेब्रूवारी ला पडल्यामुळे संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथे एडमिट केले होते.एक्सरे काढला त्यावेळी समजले की मांडीच्या हाडाला हेयर लाइन फ्रैक्चर असल्याने हॉस्पीटल ने ऑपरेशन करून प्लेट टाकावी लागेल सांगितले. गुडघ्या खालून कापलेल्या पायाची जखम भरली नसल्याने व वय ७३ असल्याने नकार दर्शविला. त्यावेळी सदर हॉस्पीटल चे सीनियर डॉक्टर किशोर मोडखरकर यांनी भेटायला बोलवून ऑपरेशन करुण प्लेट टाकली तर दीड महिन्यात आईचा पाय बरा होईल पण जर फक्त प्लास्टर केले तर पाय बरा होन्यासाठी ४ महीने लागतील सांगितले.आईचा पाय खालुन कापलेला आहे त्यामूळे तिला चालता तर येनार नाही त्यामूळे तिला प्लास्टर करा असे सुचविले असता त्यांनी ऑपरेशन थियेटर मध्ये घेउन गेले.पायाला प्लास्टर लाऊन बाहेर आणले त्यावेळी डॉक्टरने विचित्र प्रकारे प्लास्टर मधुन एक लाकुड इंग्रजी ‘V‘ आकारचे मांडीखालून बाहेर काढलेले होते.त्यानंतर आईने सांगीतले की ऑपरेशन थियेटर मधे मोडखरकर डॉक्टर ने आणि त्यांच्या टीम ने तिचा पाय एका बाजुला खुप वेळा पिरगळा आहे. जवळपास १०-१५ मिनट ते सर्व जन पाय पिरगळत होते बहुतेक त्यान्नी माझा पाय तोडला आहे.
नंतर आईच्या पायाचा एक्सरे काढला तर त्यात आईच्या मांडीच्या हाडाचे दोन टुकडे पडलेले स्पष्ट दिसत होते.त्यामुळे लवकर ऑपरेशन करा असे मोडखरकर यांना सांगीतले. परंतु त्यावेळी ते बोलले की ऑपरेशन ला ४-५ दिवस लागतील. कारण आईच्या मांडीच्या हाडाच्या आतुन एक रॉड आणि बाहेरून एक रॉड टाकावा लागेल तसेच वरच्या आणि खालच्या बाजुला अश्या दोन प्लेट पण टाकाव्या लागतील त्या पुण्यात भेटत नसल्यामुळे दिल्लीवरुन ऑर्डर देउन मागवाव्या लागतील. त्याची किमत एक लाख रुपये असून ऑपरेशन साठी वेगळे डिड-दोन लाख रुपये लागतील. तरी आईच्या ऑपरेशन ला आम्ही होकार दिला. त्यावेळी मोडखरकर डॉक्टर बोलले होते की,आईचा जो पाय ७ महीने आधी कापला तो चुकीचा कापलेला असल्याने अजून ती जखम भरलेली नाही. नंतर कृत्रिम पाय लावला तरी चालायला त्रास होइल त्यामूळे तिच्या मांडीचे ऑपरेशन करताना तीचा पाय ५-६ इंच वरून कापून देतो.ज्यानी पाय कापला ते डॉक्टर नाफाडे यांना बोलावले असता त्यांनी मोडखरकर चुकिचे बोलत असल्याचे सांगितले.
हॉस्पिटल ने इंश्योरेंस कंपनीला आईच्या पायाची एंजोग्राफी आणि एंजॉप्लास्टी झालेली आसताना तिथे ह्दयाची एंजोग्राफी आणि एंजॉप्लास्टी झाली असा खोटा रिपोर्ट दिला त्यामुळे आईचा एडमिट होताना मंज़ूर झालेला इंश्योरेंस क्लेम रद्द झाला. दोन लाख रुपये भरा नाही तर ऑपरेशन होणार नाही असे सांगितल्यामुळे हॉस्पिटल व डॉक्टर जास्तीचे पैसे उकळण्यासाठी जाणून-बुजून त्रास देत असल्याचे लक्षात आल्याने ऑपरेशन साठी डॉक्टर बदलण्यासाठी फॅमिली डॉक्टरला सांगितले.
डॉक्टर कपिल साऊजी यांनी ऑपरेशनचे काम हातात घेतल्यामुळे त्यांनी तपासण्या केल्या. त्यांनी आधीच्या डॉक्टरने केलेल्या चुका सांगून याचे होणारे दुष्परिणाम समजावून सांगितले. ऑपरेशनसाठी जवळपास १ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगीतले. भासा निलेश चव्हाण हेल्थ इन्शुरन्स कंपनीत एरिया हेड असल्याने त्याला बोलावले असता दोन तासात हॉस्पिटलने इन्शुरन्स मंजूर केला.
घडलेला प्रकार हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट च्या डॉक्टर निलम यांना सांगीतला असता त्यांनी गांभीर्याने घेतला नाही.ऑपरेशन थियेटर चे आईला प्लास्टर साठी घेउन गेले त्यावेळेसचे सर्व सीसीटीवी फ़ुटेज् आणि प्लास्टर केल्यानंतर जो लगेच एक्सरे काढला जातो तो दया. तसेच ज्या डॉक्टर ने चुकिची महिती इंशुरेंस कंपनीला दिली त्यांचे पूर्ण नाव आणि मोबाइल नंबर द्या म्हनून विनंती केली तरी त्यांनी उड़वाउड़वीची उत्तरे दिली.
पैसे उखळण्यासाठी रुग्णाच्या जीवाशी खेळले जात असेल तर अशा डॉक्टर व हॉस्पिटल वर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यामुळे
संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंधची चौकशी होऊन चालक-मालक व डॉक्टर यांच्यावर गुन्हा दाखल होऊन कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लबाडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोट १-
संजीवनि विटा लाइफ (मेडी पॉइंट) हॉस्पीटल औंध येथे पिपंरी चिंचवड शहरातील नवी सांगवी, जूनी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख या भागातील रुग्ण मोठया प्रमाणात असतात. या हॉस्पिटलची रोजी रोटी पिपंरी चिंचवड शहरावर अवलंबून आहे. घडलेला प्रकार हा खुप संतापजनक असुन हॉस्पिटलवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.
– प्रशांत शितोळे
कोट २-
हॉस्पिटलच्या परवानग्या पैसे देऊन मिळवलेल्या असतात. अयोग्य मार्गाने रुग्णांकडून ते पैसे वसूल केले जातात. गुन्हे दाखल होऊन कायदेशीर मार्गाने न्याय मिळाला नाही तर आंदोलन करून हॉस्पिटलचा परवाना रद्द करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!