नाशिक शहरामध्ये अवैधरित्या गोहत्या करून गोमांसची वाहतूक व विक्री करणाऱ्यांवर कारवाई..
प्रतिनिधी रेणूका गायकवाड महाले नाशिक दि. ०६ जून २०२४ मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ०५/०६/२०२४ गुन्हे शाखा युनिट २ नासिकचे पोलीस कर्मचारी श्री. तेजस मते यांना मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळा गाव येथील सेंट सादिक स्कूल रोड जवळ छुप्या पद्धतीने काही इसम अवैधरित्या गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस अवैधरित्या वाहतूक करून विविध ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती मिळाली, मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री. प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संदीप मिटके, पोलीस निरीक्षक श्री. अशोक शरमाळे इंदिरानगर पो. स्टे., वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाने सापळा रचण्यात आला, मिळालेल्या माहितीप्रमाणे कारवाईमध्ये वडाळा रोड वडील स्टील स्टेटस जवळ गोमास घेऊन जाणाऱ्या वाहन क्रमांक MH 41 AU 4049 या गाडीला अडवून ताब्यात घेण्यात आले, गाडीची झाड-झडती घेतली असता गाडीमध्ये तब्बल 725 किलो मांस आढळले, आढळलेल्या मांसाची तपासणी करणे हेतू पशुवैद्यकीय अधिकारी यांना पाचारण करण्यात आले, तपासणी केली असता अखेर हे गोवंशाचे मांस असल्याचे निष्पन्न झाले, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ गाडी ड्रायव्हर अजहर सफदर खान ,वय वर्ष ३१ रा- सल्ली पॉईंट, राजवाडा जवळ, वडाळा गाव यास ताब्यात घेऊन याच्याविरुद्ध श्री. तेजस मते यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 च्या सुधारित कलम 2015 कलम 5 क , 5 ड , भा.द.वी कलम 299, 188 प्रमाणे इंदिरानगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
वाहन चालक अजहर खान याच्या जबाबानुसार हे गोमांस त्याला शोयब समद कुरेशी रा- वडाळा गाव, नाशिक, बबलू कुरेशी, अजिद कादिर कुरेशी, यांनी गाडीमध्ये भरून ते विक्रीसाठी पाठवल्याचे सांगितले, सदर आरोपी हे सध्या फरार असल्याचे समजते.
725 किलो गोमांस व वाहतूक करणारे वाहन असे एकूण सहा लाख 45 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे पोहवा मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, संजय सानप, पोलीस अंमलदार महेश खांडबहाले, तेजस मते, स्वप्निल झुंजारे, समाधान वाजे यांनी केली.