सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज या राज्यव्यापी संघटनेच्या कळंब तालुका अध्यक्षपदी बाबासाहेब टोपे यांची नियुक्ती जाहीर..

प्रतिनिधी प्रतिनिधी कळंब दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी, सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक ता. कळंब जिल्हा धाराशिव येथे संघटनेचा विस्तार वाढविणे बाबत घेण्यात आली.
या बैठकीत वरील विषयांकीत प्रश्न चर्चेत घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामधे असे ठरले की, सदरील ठिकाणी फुले, शाहू, आंबेडकर, आण्णा भाऊ, यांच्या विचार धारेवर काम करुन, समाज जागृती करणारे, तसेच महा ई सेवेच्या माध्यमातून सर्व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी अहो रात्र तळमळीने झटणारे निडर असे कार्यकर्ते आयु. बाबासाहेब टोपे यांच्या नेतृत्वाखाली कळंब तालुक्यातील गोरगरिबांना न्याय मिळावा, त्या करिता बाबासाहेब टोपे त्यांचेकडे अध्यक्ष पदांची धूरा देण्यात यावी, असे सर्वांनूमते ठरले अनुसार, सन्माननीय आयु. बाबासाहेब टोपे रा. सावरगाव पुनर्वसन,ता.
कळंब जिल्हा धाराशिव यांची कळंब तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
या निवड नियुक्तीचे पत्र सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिमरत्न, प्रा.बी.बी.शिंदे यांनी दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी कळंब मुक्कामी टोपे साहेब यांना दिले.
या योग्य अशा निवडीमुळे आयु. बाबासाहेब टोपे यांचे सर्व जनतेतून अभिनंदन करण्यात येत आहे.



