आरोग्यगून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

उत्तेजक इंजेक्शन विक्री प्रकरणी तरुणीला अटक, ४६ बाटल्या जप्त..

प्रतिनिधी पुणे दि. १८ फेब्रूवारी २०२४ उत्तेजक इंजेक्शन विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या एका तरुणीला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. तर व एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून इंजेक्शनच्या ४६ बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी दि.१५ सायंकाळी सहाच्या सुमारास स्वारगेट येथील सोलापूर एसटी स्टँड येथे केली.
याबाबत पोलीस अंमलदार प्रविण बाळासाहेब गोडसे वय-३१ यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन निकिता शशीकांत जाधव रा. सह्याद्री हॉस्पीटल जवळ, बिबवेवाडी गावठान, पुणे व दोन अल्पवयीन मुलांवर आयपीसी २७६, ३३६, ३२८, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन निकिता जाधव हिला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निकिता हिने तिच्या नावावर १५ हजार ४०० रुपयांच्या मेफेनटरमाइन इंजेक्शन आयपी ४६ बाटल्या मागवल्या होत्या. तिने या बाटल्या दोन अल्पवयीन मुलांना विक्री करण्यासाठी दिल्या होत्या. आरोपींकडे इंजेक्शन खरेदी केलेल्या बाटल्यांचे खरेदी केलेले बिल नव्हते. या इंजेक्शनचे दुष्परिणाम होऊन, इंजेक्शन घेणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला धोका किंवा आरोग्याला गंभीर इजा होऊ शकते, हे माहित असताना आरोपींनी मेफेनटरमाइन इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगताना पकडण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!