महाराष्ट्रराजकीयशहरसामाजिक

सर्वसामान्य निष्ठावंत श्री.संतोष धोंडीराम माळी यांची भोसरी विधानसभा ओबीसी विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १९ ऑक्टोंबर २०२३ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई प्रदेश कार्यालय या ठिकाणी ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष राजसाहेब राजापूरकर व पिंपरी चिंचवड ओबीसी सेल शहराध्यक्ष भाई विशाल जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले सोबत पुणे जिल्हा ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.अतुल राऊत, असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री.काशिनाथ नखाते, चिंचवड विधानसभा युवक अध्यक्ष विशाल क्षीरसागर, युवराज निलवर्ण व इतर सहकारी मित्र, मार्गदर्शक उपस्थित होते.

नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजसाहेब राजापूरकर म्हणाले “पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे त्या ठिकाणी कामगार वर्ग, कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत तसेच नव्यानेच त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आय. टी. हब मुळे आय. टी.चा ग्राउंड सुद्धा झालेला आहे. येत्या काळामध्ये शरद पवार साहेबांचे विचार प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचवण्याचं काम आमचे शहराध्यक्ष भाई विशाल जाधव करत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून भोसरी विधानसभेमध्ये येत्या काळामध्ये संतोष माळी काम करतील यामध्ये आमची तिळमात्र शंका नाही. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यामध्ये लवकरच ओबीसी मेळावा शरद पवार साहेबांचे नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.”

 संतोष माळी पत्र स्विकारताना म्हणाले "पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गेल्या अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मी काम करत आहे काम करत असताना माननीय अमोल कोल्हे साहेब यांच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने काम केलेला आहे. बूथ कमिटी लेव्हलचा अनुभव दांडगा असल्या कारणामुळे आज माझी भोसरी विधानसभा ओबीसी विमागच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार व्यक्त करतो."

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!