शहरसामाजिक

अनुवाद आपलाच्या बातमीचा असर “अतिक्रमात पाडलेल्या वाचनालय व विहारासाठी जागा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल” या चर्चेला वंचितला बोलावले.

प्रतिनिधी-वंचित बहुजन आघाडी पिं. चिं. शहर व भोसरी विधानसभेच्या वतीने दिनांक 28 एप्रिल 23 रोजी तीव्र आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात केले स्थानिक गावगुंड व प्रस्थापितांच्या सांगण्यावरून अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय तसेच वंचित बहूजन आघाडी कार्यालय दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी जमीनदोस्त केले आंदोलनादरम्यान महानगरपालिका सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे सर यांच्यासोबत चर्चा झाली त्यांनी सदर अधिकाऱ्यांना कारवाई का व कशा साठी केली याबद्दल खुलासा मागितला आहे. सर्व बाबींची शहानिशा करून वाचनालया साठी व विहारासाठी जागा कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल याबद्दल चर्चा केली त्यानंतर दुपारी सन्माननीय आयुक्त साहेब यांना निवेदन देऊन त्यांचे सोबत सविस्तर चर्चा झाली जागा उपलब्ध करून देणे संदर्भात काय करता येईल याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करतो असे सांगितले. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकाळजे साहेब यांनी देखील सहकार्य केले. या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष अनिल अण्णा जाधव, प्रदेश सचिव अनिताताई सावळे, पिं ची महासचिव संजीवन कांबळे, उपाध्यक्ष विक्की तामचेकर, दीपक भालेराव, धनंजय कांबळे, किरण हिंगने, सचिव राजेंद्र साळवे, बाबासाहेब शिवशरण, जितेंद्र मोठे, संघठक सतीश गायकवाड, विष्णू सरपाते, वाहतुक आघाडी उपाध्यक्ष सूरज मसूरे, सोनू शेळके, शाखाअध्यक्ष सचिन ओव्हाळ, विशाल धुळधुळे, विजय गेडाम, गजेंद्र कांबळे, अकाश वीर, प्रशांत नाटेकर, जानराव, भैय्यसाहेब ठोकळ, इश्वर कांबळे, प्रवीण कांबळे, छकुल्या जाधव, पिंटू कदम, मनोज जाधव, महेश लगाडे, अनुसयाताई भारती, मंदाकिनीताई गायकवाड, मनीषाताई साळवी, बबिताताई शिंदे, उषाताई वाघमारे, अर्चना ससाणे, कविता गरूड, प्रतिभा बनसोडे, गंगा भेंडेकर, छाया गायकवाड, संघर्ष शिंदे, बाळा शिंदे, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर आंदोलनाचे आयोजन व नियोजन वंचित बहुजन आघाडी भोसरी विधानसभा अध्यक्ष अनिल भारती यांनी केले असे त्यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button