वर्षावासानिमित्त सांगवी येथील समता बुध्दविहार येथे भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवडच्या वतीने प्रवचन मालीका सुरु..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ जूलै २०२४ वर्षावास आरंभ इ.स.पूर्व ५३४ मध्ये क्षत्रियराजा सिध्दार्थ गौतमाने विश्व कल्याणाचा मार्ग शोधण्यासाठी वयाच्या २९व्या वर्षी गृहत्याग केला. सहा वर्षे वेगवेगळ्या तपश्चर्या केल्या शेवटी बुध्द गया येथे इ.स.पूर्व ५२८ ला सम्मेक – संबोधी दिव्य ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी अनुभवले जगात दुःख आहे. दुःखाला कारण आहे. दुःख आनेक प्रकारची आहेत या चार आर्य सत्याचा शोध लावला. मानवाच्या दुःख मुक्तिचा मार्ग आर्यअष्टांगिक मार्गाचे पालन केल्यास मनूष्य दुःख मुक्त होतो. हा धम्म प्रथम सारनाथ येथील मृगदायी वनात वप्प, भध्दीय, कौंडण्य, अश्वजित, महानाम, या उपासकांना दिला व धम्म प्रचाराचा आरंभ केला गेला. त्यालाच पहीले धम्म चक्रपरिवर्तन म्हणतात पुढे पावसामुळे भिक्खूच्या जिवितास धोका निर्माण झाला, आजार, पाण्यात वाहुन जाण्याने मृत्यु, त्यामुळे सुरक्षीत स्थळी बसुन धम्म अध्ययन व प्रवचन आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा वर्षावास काल ठरला. व आजही सुरूच आहे.
दोन दिवसांन पूर्वी आषाढ पौर्णिमा २१ जुलै ममतानगर सांगवी येथील समता बुध्दविहार, येथे सकाळी ११ वा. भारतीय बौद्ध महासभा पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे वतिने उद्घाटन झाले. पिंपरी चिंचवडशहराच्या सर्व बुध्दविहारा मधे पुढील चार महीने आषाढ पौर्णिमा ते आश्वीन पौर्णिमा या काळाता प्रवचन मालिका सुरु करण्यात येत असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष डी. व्ही. सुरवसे, संस्कार विभाग जिल्हा हे होते. प्रमुख उपस्थिती मधे भिक्खू धंमानंद थेरो, भंन्ते धम्मानंद, अध्यक्ष, राधाकांत कांबळे. पिं.चिं.जिल्हा, सरचिटणिस, भिमराव ढोबळे, कोषाध्यक्ष, मे. विनोद कांबळे, अध्यक्षा महीला रेखाताई ढेकळे, जिल्हा मा. अध्यक्ष धम्म भुषण बापूसाहेब गायकवाड, मेजर सुरेश भालेराव, रामचंद्र आचलकर, शोभाताई गायकवाड, शारदाताई गायकवाड, शामाताई जाधव, नवगिरेताई, गवळीताई, तालुका अध्यक्ष अशोक सरतापे, मच्छिंद्र कदम, गौतम रिकबे, माणिक निसर्गंध अशोक यादव, संजय चव्हाण, आणि पिंपरी चिंचवड जिल्हा
कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, महीला कार्यकारणी, बंधु -भगिनी उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.



