
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०५ फेब्रुवारी २०२५ वाहनातील प्रदूषण फटाके आणि कचरा जाळल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
मी खूप फटाके वाजवले म्हणजे मी खूप मोठा असा समज पसरत चालला आहे. पण यामुळे वायू प्रदूषण होऊन अनेक रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे.
वायु प्रदूषणामुळे विविध रोग होऊन भारतात दरवर्षी 16 लाख माणसे मृत्युमुखी पावतात. यातूनच अंघोळीची गोळी या संस्थेने ऐन दिवाळीत ” मी फटाके वाजवले नाही” अशी स्पर्धा घेतली. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरातील 20 शाळांमधून 275 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि सांगितले की आम्ही फटाके वाजवले नाहीत.
या उपक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ आज सिटी प्राईड रावेत या शाळेत पार पडला. अध्यक्षस्थानी सिटी प्राईड शाळेच्या संचालिका डॉ.दीपाली सवाई या होत्या.
प्रथम तीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना अनुक्रमे 3000, 2500 आणि 2000 अशी रोख रक्कम देण्यात आली. पहिला क्रमांक स्वामिनी सुरवसे, दुसरा अवंती भिमटे आणि तिसरा श्रीया पडळ यांचा तर मुलांमध्ये पहिला तेजस गरसे दुसरा आदित्य बेनके तर तिसरा क्रमांक ध्रुव घाटगे याचा आला. सहभागी सर्व 275 विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन फटाके न वाजवल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी क्लायमेट ॲक्शन या इंग्रजी शब्दाला हवामानठोसा असा मराठी शब्द देऊन या शब्दाचे अनावरण विद्यार्थी आणि सवाई मॅडमच्या हस्ते करण्यात आले.
फटाके न वाजवणे म्हणजे प्रदूषण कमी करणे म्हणजेच हवामान ठोसा देणे होय.
हवामान ठोसा म्हणजे निसर्ग वाचवण्याची पंचसूत्री असे डॉ. सवाई मॅडम म्हणाल्या.
यावेळी अंघोळीची गोळीच्या उपक्रम अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुमेधा फडके आणि अंघोळीची गोळी संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील उपस्थित होते.



