महाराष्ट्रविशेषसामाजिक

श्रीनीता फाऊंडेशनकडून प्रत्येक वर्षी “हूमरन आदिवासी पाडा” ला भेट दिली जाते.

प्रतिनिधी-पालघर हूमरन आदिवासी पाडा मागच्या वर्षी केलेला लायब्ररीचा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला. त्याचप्रमाणे या वर्षी देखील १५ ऑगस्ट २०२३, स्वातंत्र्य दिनाच्या निमत्ताने आदिवासी पाडाला भेट देण्याचे, त्यांना मदत पुरविण्याचे आणि त्यांच्या सोबत ध्वजारोहन कार्यक्रम करण्याचे “श्रीनीता फाऊंडेशन” ने योजिले आहे.
“जिल्हा पालघर, तालुका जव्हार, आणि माड विहिरा पासून ५ कि.मी. पुढे चालत गेल्यावर हूमरन नावाचा आदिवासी पाडा” लागतो. तेथे राहणाऱ्या आपल्या आदिवासी बांधवांची स्थिती फारच हालाखीची आहे. आणि त्यांना आपल्या मदतीची खरी गरज आहे. त्यांच्या गरजा पूर्ण करायला वापरात नसलेले कपडे, ब्लँकेट, चादर, चपला, बिस्कीट, खाऊ चे पदार्थ त्याचप्रकारे आर्थिक मदतही तुम्ही करू शकता. असे संस्थेच्या अध्यक्षा नीता गवळी यांनी सांगीतले. सोबत त्यांनी अवाहन ही केले की ज्यांना या कार्यक्रमात सहभागी राहून कपडे किंवा खाऊचे पदार्थ देवून आपले मोलाचे सहकार्य करायचे आहे त्यांनी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
नीता गवळी – 9773775603
तेजश्री गवळी – 9702209082
आर्थिक मदतीसाठी
Gpay / Paytm
9664184042 धनश्री गवळी
पूढे त्या हेही बोलल्या की मला हे नक्कीच सांगावेसे वाटेल की जे कपडे, चपला आणि खाऊ आपण त्यांना पुरवतो तेच ते पूर्ण वर्षभर वापरतात त्यामुळे जेवढी जास्त मदत करता येईल तेवढी नक्कीच करा. अशी विनंती करायला त्या विसरल्या नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!