आंदोलनमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

उरण व शिव मधील महिलांवर अत्याचाराबाबत जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदन..

प्रतिनिधी पूणे दि. ३१ जूलै २०२४ राज्य शासनाने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे परंतु दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्याभरात उरण आणि शिळफाटा येथे महिलांवर अमानुषपणे अत्याचार करून त्यांचा निर्दयपणे खून करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गृह खात्याची इज्जत वेशीवर टांगली गेली आहे. महिलांच्या होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांच्या निषेधार्थ आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातर्फे महिलांनी आंदोलन केले गेले. महिलांना दरमहा दीड हजार रुपये देऊन त्यांची तोंडे बांधण्याचा सरकारचा डाव असून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मात्र त्यांनी बाजूला ठेवलेला आहे.
दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी या घटनांबाबत चकार शब्द काढलेला नाही. या घटनांकडे गंभीर्तने त्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे या घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आणि निर्दिस्त असलेल्या गृह खात्याला खडबडून जागे करण्यासाठी व घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटा महिलांनी जोरदार निदर्शने केली.
पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे व प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा अध्यक्षा भारती शेवाळे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!