
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ ऑक्टोंबर २०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २०११ ते २०१५ पर्यंतचा सफाई कामगारांचा पी.एफ. अजूनही जमा केलेला नाही. याच मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामठे (शरद पवार गट) यांनी सफाई कामगारांना सोबत घेऊन पालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी ते सफाई कामगारांना पालिकेचे सह आयुक्त डांगे साहेबांच्या केबिनबाहेर बसले आणि जोपर्यंत चर्चा करून मागणी मान्य होत नाही तोपर्यंत इथेच बसून राहणार हा पवित्रा कामठेंनी घेतला. शेवटी डांगे साहेब यांनी स्वतः सर्वांशी चर्चा केली आणि येत्या १५ दिवसात थकबाकी असलेला पी. एफ. जमा होईल असे आश्वासन दिले. यावेळी असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे अध्यक्ष संदीपान झोंबाडे, फेरीवाला हॉकर्स महासंघाचे अध्यक्ष प्रल्हाद कांबळे, असंघटित कष्टकरी कामगार महासंघाचे सचिव सविता ताई खराडे, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ आणि सफाई कामगार उपस्थित होते. आंदोलनाला यश आल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला.




