प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ ऑगस्ट २०२४ पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने काल बुधवार दिनांक २१/०८/२०२४ रोजी संध्याकाळी ४ वा. बदलापूर येथील साडेतीन वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा “भीमसृष्टी” पिंपरी या ठिकाणी निष्क्रिय सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच आरोपीला फास्टट्रॅक वर केस घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच राज्यामध्ये महिला आणि मुलीची सुरक्षा रामभरोसे आहे. या घटनेमुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली.
“लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना पहिली सुरक्षा द्यावी.” असे आंदोलना दरम्यान सांगण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे, शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले, चेतन पवार युवासेना, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, योगेश बाबर, विधानसभा प्रमुख, तुषार नवले, अनंत कोन्हाळे, उपशहर अमोल निकम, पांडुरंग पाटील, अनिल सोमवंशी, राजाराम कुदळे, गुलाब गरुड, युवराज कोकाटे, विभाग प्रमुख सतीश मरळ, विकास भिसे, प्रदीप महाजन, गोरख नवघणे, गोरख पाटील, गोविंद शिंदे, उपविभाग प्रमुख श्रीकांत चौधरी, गंगाधर काळे, शाम भाऊ पवार, सागर शिंदे, बाळासाहेब जम, राजु मिसळ, घनश्याम कुदळे, सचिन चिंचवडे, सुनील ठोकळ, भारत इंगळे, राम उत्तेकर, नाथाभाऊ खांडेभराड, राजु निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.