बोपखेल येथे गणेश विसर्जना निमित्त गणरायाला भक्तीपुर्न वातावरण निरोप व स्वयंसेवकांच्या सन्मान..
प्रतिनिधी जावेद शेख पिंपरी चिंचवड दि. १८ सप्टेंबर २०२४ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून पत्रव्यवहार करुन बोपखेल (मुळा -पवना) नदी विसर्जन घाट सु-सज्ज ठेवण्यात आला होता.
बोपखेल घाटावर मंडळ व घरगुती गणपती विसर्जन हे मोठ्या प्रमाणात होतं असतात आशा वेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमातून कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, पोलिस बांधव
गणपती घेवुन जाण्यासाठी टाॅम्पो चालक असे अनेक नागरिक या ठिकाणी सेवा करण्याचे काम पाहत असतात आशा वेळी त्यांच्या कार्याचे कौतुक केलं गेलं पाहिजे ह्या उद्देशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतिने त्यांच्या सन्मान करण्यात आला..
आशा वेळी भोसरी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. विश्वनाथ चव्हाण (साहेब) व श्री. दत्तात्रेय कांबळे (साहेब) ह्यांनी विसर्जन घाटाची पाहणी केली व विसर्जन घाट या ठिकाणी केलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेतला.
यावेळी “श्री. भाग्यदेव घुले ” व “श्री. संतोष गायकवाड” यांनी विसर्जन घाटावर गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी बनविण्यापासुन व आलेल्या कुत्रीम हौदाची वेळोवेळी साफसफाई व पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी पाठपुरावा केला व श्री निळकंठ महाराज झपके ह्यांनी मार्गदर्शन केले.
पालिकेमार्फत विसर्जन घाटावर गणेश भक्तांच्या मार्फत दान करण्यात येणाऱ्या घरगुती गणेशमूर्तिचे संकलन करण्याची व्यवस्था करण्यात आली होती
घाटावर “विद्युत रोषणाई” करुन वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले.
विसर्जन वेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून देखरेख करण्यासाठी “CCTV कॅमेरे” बसविण्यात आले होते…
त्यावेळी शिव मल्हार स्थापना समिती सदस्य दत्तात्रेय घुले, नंदु घुले, संकेत पाटील, मारुती मोरे, दिनेश लोंढे, नवनाथ शितोळे, रोहिदास जोशी, अशोक वाहिले, दत्ता घुले उपस्थित होते.