महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा लवकरच निर्णय घेऊ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रतिनिधी बारामती दि. १९ डिसेंबर २०२३ काल दि. १८ डिसेंबर २०२३ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशना दरम्यान बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. सागरजी डबरासे साहेब यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब म्हणाले की बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समिती महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव प्रशांत विष्णू सोनवणे व उपाध्यक्ष गणेश मारुती चव्हाण यांच्या वरील बारामती बस स्थानकाच्या मुख्य भिंती वर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती असा प्रतिमात्मक नामांतर केलेला फलक लावण्याने बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झालेला मागे घेण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले. अशी माहिती मा. सागरजी डबरासे साहेब यांनी दिली. यावेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!