गून्हापूणेमहाराष्ट्रविशेष

नारायणगाव एस टी स्टैंड परिसरात तीन संशयितांना तीन गावठी पिस्तुल, नऊ काडतूसासह केले जेरबंद..

मोटार सायकलसह एकूण १,७५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणची उल्लेखनीय कामगिरी..

प्रतिनिधी नारायणगाव दि. ०६ नोव्हेंबर २०२५ मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलन पुणे ग्रामीण, यांचे आदेशान्वये दि.३०/१०/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथक संयुक्तरित्या अवैध गावठी पिस्तुल तस्करी करणारे, बाळगणारे, खरेदी-विक्री करणारे गुन्हेगारांवर कारवाई करणेकरीता नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, दहशतवाद विरोधी पथकातौल पो.काँ. ओंकार शिंदे व पो.काँ. मोसीन शेख यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नारायणगाव एस.टी. स्टैंड परिसरात एका स्प्लेंडर मोटार सायकलवर तीन इसम संशयित रित्या फिरत असून त्यांचे जवळ गावठी पिस्तुल आहेत. अशी बातमी मिळाल्याने पथकातील दहशतवाद विरोधी शाखेचे सपोनि प्रकाश पवार यांनी स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना गोपनीय बातमीचा मजकूर सांगितला व कारवाईचे आदेश प्राप्त करून घेतले.
कारवाई करणारे पथकातील स्था.गु.शा.चे सपोनि महोदव शेलार यांनी दोन पंचांना बोलावून घेवून स्थानिक गुन्हे शाखा व दहशतवाद विरोधी शाखेचे पथकाने संयुक्तरित्या कारवाई करून नारायणगाव एस.टी. स्टैंड परिसरातून आरोपी नामे १) धनंजय चक्रधर साळुंखे, वय २० वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे २) सुरज आप्पासाहेब कडाले, वय १८ वर्षे, रा. रामलिंग शिरूर ता शिरूर जि पुणे, ३) अनमोल दादाभाऊ जाधव, वय २७ वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे असे तीन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यांचे अंगझडतीत प्रत्येकाजवळ अवैध रित्या बाळगलेली एकूण तीन गावठी पिस्तुल, नऊ जिवंत काडतूस व मोटार सायकल असा एकूण १,७५,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे.
आरोपी नामे १) धनंजय चक्रधर साळुंखे, वय २० वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे २) सुरज आप्पासाहेव कडीले, वय १८ वर्षे, रा. रामलिंग शिरूर ता शिरूर जि पुणे, ३) अनमोल दादाभाऊ जाधव, वय २७ वर्षे, रा. कारेगाव ता शिरूर जि पुणे यांना नारायणगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून त्यांचे विरोधात गुन्हा रजि. नंबर २२८/२०२५ भा.ह.का. ३ (१). २५ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आलेला आहे. त्यांनी सदरचे अवैध गावठी पिस्तुल खरेदी करण्यामागे व बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू आहे याकरीता पुढील तपास चालू असून अटक आरोपीस मा न्यायालयात हजर करेण्यात आले असता, मा. न्यायालयाने त्याची दि.०४/११/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली होती, दहशतवाद विरोधी शाखा, स्था. गु.शा., व नारायणगाव पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहेत.
यातील आरोपी धनंजय साळुंखे याचेवर यापूर्वी शरोराविरूद्धचा दुखापतीचा एक गुन्हा दाखल आहे.
अवैध अग्निशस्त्र साठा हस्तगत करून चांगली उल्लेखनीय कामगिरी केल्याने मा. संदीप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी कारवाई करणारे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक करून सर्वस्थरातून अभिनंदन केले जात आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, जुन्नर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दहशतवाद विरोधी पथकाचे सपोनि प्रकाश पवार, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, नारायणगाव पो. स्टे.चे सपोनि प्रविण सपांगे, पोसई जगदीश पाटील, स्था.गु.शा. व दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकातील अंमलदार विक्रम तापकीर, दिपक साबळे, मोसीन शेख, संदिप वारे, ऑकार शिंदे, गणेश चंदनशिव, हेमंत विरोळे, अक्षय नवले, रविंद्र जाधव, सुनील कोळी, संकेत जाधव, चेतन पाटील यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!