२६\११ च्या दहशतवादी भ्याड हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली!..
प्रतीनीधी सतिश पाटील मुलुंड दि. २७ नोव्हेंबर २०२४ काल २६\११ च्या भ्याड हल्ल्यात देशवासियांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढलेल्या मुंबई पोलीसांचे तसेच देशाच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्या वीर जवानांचे स्मरण व्हावे म्हणून प्रभाग क्र. १२ सिध्देश्वर तलाव येथील शहीद उद्यानात शहीद स्मारक बांधण्यात आले या शहीद उद्यानात मध्ये माजी खासदार राजन विचारे याच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शहीद जवानांना मानवंदना बॅड पथक यांनी धून व बिगुल वाजवून देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिक कारगिल युद्ध विश्व विजेते राजू पाटील, आर्मी बाॅक्सर, राष्ट्रीय शुटर जयदीप भोईर, नौपाडा पोलीस ठाणे वरिष्ठ निरीक्षक अभय महाजन, कॅप्टन शंकर कदम, कॅप्टन जयसिंग निकम, निवृत्त पोलीस अधिकारी सोनावणे, माजी खासदार राजन विचारे, माजी नगरसेविका नंदीनी विचारे, मंदार विचारे, रेखा खोपकर, सचिन चव्हाण, दिपक साळवी, पत्रकार सतिश पाटील मुलुंड, ठाणे उपशहर प्रमुख वासुदेव भोईर, विभाग संघटीका रसिका सुभेदार, आंकाक्षा राणे, निवेदिका अश्विनी कानोलकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.