साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकच्या विटंबनेच्या निषेधार्थ अमरण उपोषणाचा इशारा- अरूण जोगदंड
प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि. २८ नोव्हेंबर २०२४ मेट्रो, पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन यांना वारंवार लेखी स्वरुपात साहित्यरत्न लोकशाहीर डाॅ. अण्णाभाऊ स्मारकाची योग्य ती दक्षता घेऊन मेट्रोचे काम करावे अशा अनेक विनंती अर्जाद्वारे कळविण्यात आले असले तरी देखील मेट्रो प्रशासनाकडून जाणीवपूर्वक अनुसूचित जातीच्या महापुरुषाची विटंबना करण्यात आली आहे, या निंदनीय कृतीचा सर्व स्तरातून जाहीर निषेध करण्यात आला आहे.
अखेर आज प्रशासनाला पत्राद्वारे कळविण्यात आले की, या गंभीर घटनेची कल्पना पत्राद्वारे देण्यात आली होती. तरी आपण या गंभीर प्रकारावर जाणिवपूर्वक कोणतीही कारवाई केलेली नाही. तरी सदर प्रकारात आपण मेट्रो प्रशासनास पाठीशी घालत आहात असे दिसुन येत आहे. असं निवेदनात नमुत करण्यात आले.
या घटनेमुळे मातंग समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महानगर पालिका व मेट्रो प्रशासन यांच्या विरोधात महानगरपालिका प्रवेश द्वारासमोर मातंग समाज्याच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येणार आहे.
या संर्भात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा मा.अध्यक्ष अरूण जोगदंड, संजय ससाणे, युवराज दाखले, अध्यक्ष नितीन घोलप, आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब पाटोळे, अविनाश शिंदे, अमोल लोंढे, शिवाजी खडसे आदींनी दिला आहे.