क्रीडादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

एका ५२ वर्षीय भारतीय महीलेने रचला इतिहास..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. ०७ जानेवारी २०२५ आंध्र प्रदेशातील ५२ वर्षीय जलतरणपटू ‘गोली श्यामला’ हिने समुद्रात १५० किलोमीटर पोहून इतिहास रचला. विशाखापट्टणम ते काकीनाडा हा आव्हानात्मक प्रवास पूर्ण करणारी श्यामला ही पहिली आशियाई महिला ठरली आहे. २८ डिसेंबर रोजी त्यांनी विशाखापट्टणम मधील आर.के. बीच येथून प्रवास सुरू केला आणि सतत ५ दिवसात सूर्यरावपेट एनटीआर बीच (काकीनाडा) येथे पोहोचून आपले यश नोंदवले. श्यामला दररोज ३० किलोमीटर पोहायची आणि तिच्या या प्रवासातून तिने महिलांसाठी एक प्रेरणास्थान बनून एक आदर्श निर्माण केला. राम सेतू, श्रीलंका आणि लक्षद्वीपमध्ये पोहणारी श्यामला तिच्या अदम्य इच्छाशक्ती आणि धैर्यासाठी ओळखली जाते. हैदराबादची ही जलतरणपटू जिद्द आणि लवचिकतेचे उदाहरण बनली आहे. पण लोक फक्त रील्स वर नाचऱ्या मुलींनाच लाईक करतात. अशा कौशल्याकडे सर्वजण दुर्लक्षच करतात. अभिमानास्पद गोष्ट एक भारतीय महीला पुरस्कार घेऊन, गावाचे, आईवडीलाचे नाव लौकिक केले इतरांनी आदर्श घेण्यासारखा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!