आंदोलनमहाराष्ट्रशहर

पुनर्वसन करतेवेळी पालिकेने दिलेला शब्द न पाळल्याने वेताळ नगर बौद्ध जनतेचे पालिकेसमोर चक्री उपोषण..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० जानेवारी २०२५ वेताळ नगर झोपडपट्टी मधील १९९५ पासूनचे बुद्ध विहार ( झोपडी) क्रमांक ३/२८/११/४ यानंतरचे त्या झोपडीचे सुधारित क्रमांक ३/५१/c३५ या झोपडी, बुद्धविहारचे जागेवर असलेले पक्के बुद्ध विहार व त्यापुढील मोकळी जागा मनपाने सदर झोपडपट्टीचे पुनर्वसन करतेवेळी २००८ साली बुद्धविहार पुन्हा बांधून देऊ असा शब्द देऊन, बुद्ध विहार तोडले त्यापुढील जागा व बुद्ध विहार जागा ताब्यात घेण्यात आली, पुनर्वसन झाल्यावर आजपर्यंत आम्हाला ठरल्या प्रमाणे बुद्ध विहार बांधून दिले नाही म्हणुन मनपा समोर समस्त समाजा तर्फे आंदोलन घेण्यात आले आहे.
या बुद्ध विहाराचे जागेवर आम्ही लोक वर्गणीतून पत्रा शेडचे विहार उभारले, तसेच त्यापुढे असलेल्या जागेवर बुद्ध वंदना, भीम वंदना परित्रानपाठ व इतर धार्मिक कार्यक्रम राबवत असून, या जागेवर काही समाजकंटकाकडून अतिक्रमण करून भंगार व्यवसाय, टपरी व्यवसाय सूरू करण्याचे प्रयत्न होत आहे.
या संदर्भात निविदन दिले आहे या निवेदनावर आम्ही खालील सह्या करणारे सुमेध बोधिसेवा ट्रस्ट रजिस्टर क्रमांक ८१८३ पुणेचे नोंदणीकृत पदाधिकारी आहोत आमचे वेताळनगर झोपडपट्टीमध्ये १९९५ पासून बुद्धविहार होते. त्याचे त्यावेळचे झोपडी फोटो पास मनपाने आम्हाला दिले आहे. त्यावेळी झोपडी क्र. ३/२८/११/४ असा होता. कालांतराने आम्ही सदर विहार वीट बांधकाम करून पक्के बांधले होते. त्यापुढे जवळपास पाच ते सात गुंठे जागा होती या बुद्ध विहार व त्यापुढील जागेत येथील गोरगरिबांचे लग्नकार्य, बुद्ध वंदना, भीम वंदना, अशिक्षित नागरिकांना साक्षरता वर्ग, व इतर धार्मिक कार्यक्रम होतात. यानंतर मनपाचा सर्वे झाला त्या सर्वे मध्ये सदरचे बुद्ध विहारास झोपडी क्रमांक ३/५१/ सी३५ असा नव्याने देण्यात आला. कालांतराने सदर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले या ठिकाणी बुद्ध विहाराचे देखरेख करणारे सुमित बोधी सेवा ट्रस्टचे पदाधिकारी व समस्त समाज बांधव यांना एकत्रितरित्या मनापाकडून सांगण्यात आले की या झोपडपट्टीचे पुनर्वसन करायची असल्याने या पुनर्वसनात आम्ही आपणास पक्के बुद्ध विहार बांधून देऊ त्या पुढील जी जागा आहे तीला पक्के वॉल कंपाऊंड बांधून देऊ. असे सांगीतले होते. याबाबत झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन विभागाकडून क्रमांक झोनिपू ९/कावी/१७६/२००८ दिनांक २२/०८/२००८ हे पत्र देऊन संक्रमण शिबिरातील पत्राशेड क्रमांक २६५ हा तात्पुरता निवासी शेडचा ताबा दिला होता. पुनर्वसन पूर्ण होईपर्यंत आम्ही सर्व धार्मिक कार्यक्रम या पत्राशेड क्रमांक २६५ मध्ये करीत होतो. सदर वेताळ नगर पुनर्वसन प्रकल्प २०१३ सालीपूर्ण झाला.
यानंतर सर्व रहिवाशांना पक्के घरे देण्यात आली पण गेले अकरा वर्षे या बुद्धविहारचे पक्के बांधकाम व सीमा भिंतीचे काम आद्यापपर्यंत मनपाने करून दिलेले नाही. याबाबत आम्ही मनपला वेळो वेळी पत्र व्यवहार केलेले आहेत. पण मनपाने काहीच निर्णय घेतलेले नाही.
यादरम्यान बुद्धविहाराच्या आरक्षित जागेवर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने वीज वितरण कंपनी लिमिटेड वतीने दोन गुंठे जागेवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी मोठे विद्युत ट्रान्सफॉर्मर ठेवून त्याद्वारे आसपासचे वीज ग्राहकांना विद्युत पुरवठा देत आहेत. त्यामुळे मनपाने बुद्ध विहारसाठी आरक्षित जागे मधून दोन गुंठे जागा कमी झाली. २०१९ मध्ये झोनिपू पत्र क्रमांक २/स्था/कावी/१८७/२०१९ अन्वये आम्हाला सांगितले कि माननीय आयुक्त साहेबांनी बांधकाम विभागाकडून परवानगी घेऊन प्रस्ताव फेर सादर करावा असे शेरांकन केले असे पत्र आम्हाला दिले पण त्यानंतर 2019 पासून आज पर्यंत त्यावर कोणतीच कारवाई झाली नसून. या बुद्ध विहाराचे पक्के बांधकाम व त्यापुढील सीमा भिंतीचे कामे लवकरात लवकर सूरू करावीत या मागणीसाठी गुरुवार दिनांक ०९ जानेवारी २०२५ पासून मनपा आऊट गेट समोर सुमेध बोधि सेवा ट्रस्टचे पदाधिकारी व समस्त समाज बांधव यांचे वतीने आंदोलन / चक्री उपोषण करण्यात आले आहे.
यावेळी मंगलताई बनसोडे, अंजलीताई गायकवाड, मंगलताई गायकवाड, ताई गायकवाड, शामल गायकवाड, पुजा गायकवाड, जयश्री कांबळे, प्रतिक्षा कांबळे, आशा कांबळे, सिमा कांबळे कमल कांबळे, पार्वती सुर्यवंशी, सोनाली सरवदे, महानंदा बनसोडे, लक्ष्मी बनसोडे, प्रकाश कांबळे, प्रसाद कांबळे, दत्तु कांबळे, अनिल कांबळे, अमोल सरोदे, हरिश डोळस, रामभाऊ ढोके, दत्ताभाऊ गायकवाड, अमोल सरोदे, दत्तू कांबळे, अशोक भालेराव, गायकवाड बालाजी, देवा कांबळे, अनिल काबळे, गणेश शिवशरण, अमित शिवशरण, ॠषिकेश गायकवाड असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!