
प्रतीनीधी सतिश वि.पाटील मुलुंड मूंबई दि. ११ जानेवारी २०२५ खारघर मधील फणसवाडी आदिवासी पाड्यात आरोग्य दूत बाजीराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते यावेळी धर्मवीर प्रतिष्ठान यांच्या वतीने नवी मुंबईमधील खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यातील मुलांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सतीश शिंदे, अजय घोड़के, सुनील चव्हाण, प्रीतम देशमुख, डॉ. दिगंबर अकोलकर, शाळेचे शिक्षक राम शेळके यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम पार पडला.