महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महामानवांची जयंती का ? कोणी ? व कशी साजरी करावी..प्रा. बी. बी. शिंदे

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड आचार्य अत्रे रंग मंदिर, संत तुकाराम नगर येथे, दिनांक १९मे २०२३ रोजी महामानव राष्ट्रपिता जोतिबा फुले आणि महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची संयुक्त जयंती दिनांक ११ एप्रिल ते १५ एप्रिल २०२३ रोजी, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या सहभागातून साजरी करण्यात आली. त्या कार्यक्रमाचा लेखाजोखा, करण्यासाठी, महानगरपालिकेचे मान्यवर किरण गायकवाड जनसंपर्क अधिकारी व डॉ. पवन साळवे साहेब यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, त्यावेळी या विषया संदर्भात आपले मनोगत व सूचना व्यक्त करताना प्रा. बी. बी. शिंदे संस्थापक/अध्यक्ष सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना (महा. राज्य) यावेळी असे म्हणाले की, महामानवांची जयंती का साजरी करावी ? ती कोणी साजरी करावी ? आणि ती कशाकरीता साजरी करावी. डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते “शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा”. पण आम्ही शिकतो आठवी पर्यंतच कारण सरकार पास करतय, आम्ही संघटीत होतोय वर्षातून एकदा जयंतीत डीजेवर नाचायला ! अन संघटन म्हणावेतर रोजच नविन एक संघटना स्थापण करतो अन महिन्याभरात बंद ही पाडतो. आता संघर्ष हो आम्ही संघर्ष करतोना पण फक्त कचरा गाडीवर आमच्या मूलांना नोकरी लागावी या करीता हे बाबासाहेबांना अपेक्षित होते का ?
बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, कबीर, आणि राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांना आपले गुरू मानले. का ?
ज्या महामानवाने यादेशातील स्त्रियाना व शूद्रांना शिक्षण देण्यासाठी, पुणे येथे भिडे वाड्यात मुलींची व शूद्रांची पहिली शाळा सुरू केली, त्या शाळेची आज काय अवस्था आहे, हे पहिलेत का कोणी जावून ? पूर्णपणे मोडकळीला आलीय ती वास्तू मग यावर उपाय काय तर त्या शाळेचे पुनर्वसन करून राष्ट्रीय स्मारक घोषित झाले पाहिजे, कारण आपण महा मानवांच्या उद्धिष्टा प्रति काम केले पाहिजे. यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
तसेच यावर्षी महामानवांच्या जयंती दिनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे समोर प्रति वर्षा प्रमाणे या वर्षी पोलिस यंत्रने करीता (पोलिस बांधवां करीता) वर छत असलेल्या स्टेजची व्यवस्था केली नव्हती. तसेच प्रति वर्षीप्रमाणे आमचे गुरुवर्य मा. पी. व्ही. मसुरे साहेब, हे जयंती निमित्त आलेल्या समाजातील प्रतिष्ठित बांधवांचे स्वागत करण्यासाठी स्टेजची व्यवस्था करून घेत होते. तशी व्यवस्था यावेळी करण्यात आली नव्हती, या कडेही गांभीर्याने लक्ष देऊन, येणाऱ्या 2024 च्या महामानवांच्या जयंती दिनी या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. व जयंती ही विचारांची कशी साजरी करता येईल यावर विचार करावा असे बोलून ते थांबले
या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!