पुण्यातील कोयता गँग मधील कुख्यात फरार आरोपी गोरख सातपुते (बप्पा) यास त्याचे साथीदारसह स्थानिक गुन्हे शाखा, बीडने केले जेरबंद..
प्रतिनिधी बीड दि. १२ जानेवारी २०२५ (स्थानिक गुन्हे शाखा-बीडची उल्लेखणीय कामगिरी) पुणे येथील कोयता गँग मधील कुख्यात फरार असलेला मुख्य आरोपी गोरख सातपुते (बप्पा) यास त्याचे साथीदारसह गेवराई शहरात स्थानिक गुन्हे शाखा,बीड ने पकडुन त्यांचेकडुन कोयता, तलवार, चाकु घातक शस्त्र केले जप्त मा. श्री. नवनीत काँवत साहेब, पोलीस अधीक्षक, बीड यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्या विरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यावरुन पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणारे इसमांची गोपनिय माहिती काढुन कारवाई करण्यासाठी अधिनस्त अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. त्यावरुन दिनांक १०जानेवारी २०२५ रोजी स्थागुशा येथील पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे हे त्यांचे पथकासह गेवराई उपविभागात पेट्रालिंग करीत असतांना पोना/ विकास वाघमारे यांना गुप्त बातमी मिळाली की, म्हाडा कॉलनी जवळ रस्त्यावर एका रिक्षामध्ये दोन इसमांकडे तलवार व कोयता आहे अशी खात्री लायक बातमी मिळताच सदर माहिती पो.नि.श्री. उस्मान शेख यांना कळवुन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पथकाला दिले त्यावरुन स्थागुशा पथक तात्काळ बातमी ठिकाणी रवाना होवुन सदर इसमाचा शोध घेण्यात सुरवात केली असता म्हाडा कॉलनी जवळ रस्त्यावर सापळा लावला सदर इसम हे पथकाला बघुन ॲटोरिक्षामधुन पळुन जाण्याचे बेतात असतांना त्यांचेवर झडप घालुन स्था.गु.शा. अधिकारी व अंमलदार यांनी पकडले. त्यांची नावे 1) प्रमुख गोरख सातपुते वय 29 वर्ष रा. काळेवाडी फाटो, थेरगाव ,जि.पुणे, 2) तात्याराव उर्फ वैभव विजय पहाडे वय 28 वर्षे रा. रहाटणी फाटा, अमरदिप कॉलनी, पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यातुन एक लोखंडी कोयता, एक लोखंडी तलवार, एक लोखंडी चाकु व गुन्हयात वापरलेली रिक्षा असा एकुण 1,04,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सफौ/तुळशिराम जगताप यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्याद वरुन नमुद दोन्ही आरोपीतां विरुध्द पो.स्टे. गेवराई येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 4,25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील दोन्ही आरोपी हे पुणे येथील कोयता गँगचे सदस्य असुन कुख्यात असुन पो.स्टे.काळेवाडी (पिंपरी-चिंचवड) गुरनं 10/2025 हाफ मर्डरच्या गुन्हयामध्ये फरार आरोपी आहेत. दोन्ही आरोपीतांना स्था.गु.शा.पथकाने पो.स्टे.गेवराई यांचे ताब्यात देण्यात आलेले असुन पुढील तपास पो.स्टे.गेवराई करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री. नवनीत काँवत पोलीस अधीक्षक,बीड , मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, पोनि श्री. उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सिध्देश्वर मुरकुटे, सफौ / तुळशिराम जगताप, पोह/कैलास ठोंबरे, मनोज वाघ, विष्णु सानप, राहुल शिंदे, पोना/ विकास वाघमारे व चालक सुनिल राठोड यांनी मिळुन केली आहे.