
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ डिसेंबर २०२४ शरदचंद्र पवार साहेबांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्यातर्फे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आयोजक देवेंद्र तायडे असे म्हणाले की पवार साहेबांनी राजकारणात अनेक चढ-उतार बघितले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धीर खचू न देता साहेबांसारखे लढायला शिकले पाहिजे. यावेळी माजी नगरसेवक राहुल कलाटे असे म्हणाले की पवार साहेबांना दिल्लीमध्ये प्रचंड आदर आहे. पवार साहेब गेली सहा दशके महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी झटले आहेत. यावेळी शहराचे सरचिटणीस जयंत शिंदे असे म्हणाले की हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री सदैव धावला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ऍडव्होकेट जयदेव गायकवाड असे म्हणाले की पवार साहेबांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा न्याय स्वातंत्र्य आणि समता हा विचार घेऊन सामान्य नागरिकांसाठी काम केले.
पवार साहेबांनी अनेक धरणे बांधली, लोकांच्या पाण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे प्रश्न सोडवले. पवार साहेबांचा विचार पुढे घेऊन अनेकांच्या जमिनी सोडवण्याचे काम मला करता आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी केले आणि प्रमोदिनीताई लांडगे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास असंघटित कामगारचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर अरुण पवार, जनाबाई जाधव, कविता कोंडे आदी उपस्थित होते.