शाहूनगर, संभाजीनगर नागरिकांना चिखली पोलीस स्टेशन हद्द लागू करावी-विनोद वरखडे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०२ फेब्रुवारी २०२५ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वाहतूक विभाग अध्यक्ष विनोद वरखडे व त्यांचे पदाधिकारी यांनी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्याकडे निवेदन पत्राद्वारे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत शाहूनगर, संभाजीनगर हा परिसर येत असून तसेच या एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या आहेत. शिक्षण संस्था तसेच गार्डन या परिसरात आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे छोटे-मोठे अपघात येथे सतत होत असून या ठिकाणी पोलीस स्टेशन संबंधित दैनिक, समस्या, अडचणी येत आहेत. वेगाने दुचाकी चालवणे, महिलांच्या गळ्यातील मौल्यवान वस्तू हिसकावने, काही टोळक्यांच्या माध्यमातून मारामारी होणे इत्यादी. घटना सतत घडत असतात व या संदर्भात तक्रारीसाठी नजीक पोलीस स्टेशन असताना शाहूनगर, संभाजीनगर येथील नागरिकांना पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्द लागू असल्यामुळे तक्रार करण्यास तेथे जावे लागते व संभाजीनगर वासीयांना निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत यमुनानगर पोलीस चौकीचे हद्द असल्यामुळे चार किलोमीटर जावे लागते. त्यामुळे येथील वाहतूकदारांना व नागरिकांना चिखली पोलीस स्टेशन हद्द लागू करावी.
वाहतूकदारांना व नागरिकांना होणारी गैरसोय यातून लवकरात लवकर चिखली पोलीस स्टेशन हद्द लागू करावी अशी मागणी आपल्या निवेदनातून त्यांनी केली आहे.