महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर प्रमुख प्रभारी संजोग वाघेरे यांची निवड जाहीर झाल्याने पक्षाला बळकटी मिळेल का ?

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ फेब्रुवारी २०२५ पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे, निष्ठावंत शिवसैनिक यांच्यामध्ये अतिशय संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
माजी शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी पक्ष फुटीच्या नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने झंजावात तयार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. परंतु लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी मध्ये काही निराशाजनक कामगिरीमुळे किंवा. विधानसभा निवडणुकीत सक्रीय सहभाग न घेतल्याने त्यांना शहरप्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले.
संजोग वाघीरे हे लोकसभा निवडणूकीत अति आत्मविश्वासामुळे पिंपरी चिंचवड शहरामधुनच कमी मतदान मिळाल्याने त्यांना पराभव स्विकारावा लागला.
त्यांना नव्याने पिंपरी चिंचवड भोसरी शहर प्रमुख पदांची प्रभारी जबाबदारी दिल्यामुळे आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळेलच असं चित्र दिसत नाही.
वास्तविक पाहता पिंपरी चिंचवड शहरांमध्ये जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना शहरप्रमुख पदाची जबाबदारी देणे अपेक्षित होते त्यामध्ये प्रामुख्याने माजी विधानसभा संपर्कप्रमुख युवराज दाखले व इतर निष्ठावंत शिवसैनिकांशी चर्चा करून जबाबदारी दिली असती तर निश्चित आगामी महानगरपालिकेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी उपयुक्त ठरले असते. मा विधानसभा संपर्क प्रमुख युवराज दाखले हे शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असून त्यांचे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बहुजन समाजात अतिशय चांगल्या पद्धतीची पकड आहे, त्यामुळे त्यांनी माजी शहर प्रमुख ॲड सचिन भोसले, यांच्याप्रमाणे झंजावात सूरू करून पक्षाला बळकटी देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असता अशी चर्चा निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये सध्या सूरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
11:23